advertisement

तुमच्याही हातावर आहे का तीळ? मग जाणून घ्या, नोकरी आणि पैशासाठी शुभ की अशुभ

Last Updated:

चंद्र पर्वतावर तीळ ज्यांच्या तळहातावर चंद्र पर्वतावर तिळाचे चिन्ह असते, त्यांचे मन अस्थिर आणि चंचल राहते

News18
News18
ज्योतिषशास्त्रात हस्तरेषाशास्त्राला खूप महत्त्व दिले गेले आहे. अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार तळहातातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेले तीळही वेगवेगळे परिणाम देतात. काही तीळ शुभ, तर काही अशुभ असतात. तळहातावर असणारा हा तीळ पाहून कोणत्याही व्यक्तीचे भविष्य आणि स्वभावाचे मूल्यांकन केले जाऊ शकते. आज आपण तिळाशी संबंधित काही खास चिन्हांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या पाहून एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो.
शुक्र पर्वतावर तीळ ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र पर्वतावर तीळ असणे शुभ मानले जात नाही. ज्यांच्या तळहातावर शुक्र पर्वतावर तीळ आहे त्यांना वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो. जोडीदारासोबत छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होतात. यासोबतच तुम्हाला सरकारी बाबी आणि नोकरीमध्ये अडचणी येऊ शकतात. मधल्या बोटावर तीळ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मधल्या बोटावरील तीळ खूप शुभ मानले जाते. असे असणे म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात. मधल्या बोटावरील तीळ जीवनात कधीही सुख आणि संपत्तीची कमतरता आणत नाही.
advertisement
चंद्र पर्वतावर तीळ ज्यांच्या तळहातावर चंद्र पर्वतावर तिळाचे चिन्ह असते, त्यांचे मन अस्थिर आणि चंचल राहते. अशा लोकांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासोबतच हे लोक प्रेमातही अपयशी ठरतात.
advertisement
गुरु पर्वतावर तीळ हस्तरेषाशास्त्रानुसार ज्यांच्या तळहातावर गुरू पर्वतावर तीळ आहे, अशा लोकांना जीवनात भरपूर संपत्ती मिळते. अशा लोकांना जीवनात कधीही संपत्ती आणि ऐश्वर्याची कमतरता भासत नाही.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
तुमच्याही हातावर आहे का तीळ? मग जाणून घ्या, नोकरी आणि पैशासाठी शुभ की अशुभ
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement