इच्छा पूर्ण झाली की फेडले जातात नवस, जालन्यात शेकडो वर्षांची उरूसाची आहे परंपरा, इतिहास माहितीये का? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
हिवाळा सुरू झाला की वेगवेगळे उरूस/जत्रा सुरू होतात. जालना जिल्ह्यातील साळेगाव या गावात शेकडो वर्षांपासून गणोजी पीर बाबांचा उरूस असतो.
जालना : विविध प्रकारचे सण, उत्सव, परंपरा आणि संस्कृती ही आपल्या महाराष्ट्राची ओळख. महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण भारत देश विविधतेसाठी ओळखला जातो. या विविधांगी परंपराचे वेड जगाला लागलंय. यामुळेच परदेशी पर्यटक भारतात येऊन या नाविन्यपूर्ण कल्पना जाणून घेतात, भारतात येतात.
हिवाळा सुरू झाला की वेगवेगळे उरूस/जत्रा सुरू होतात. जालना जिल्ह्यातील साळेगाव या गावात शेकडो वर्षांपासून गणोजी पीर बाबांचा उरूस असतो. या उत्सवाला परिसरातील नागरिक तर उत्साहाने येतातच, पण त्याचबरोबर पुणे, मुंबईला गेलेले नातेवाईक देखील आवर्जून हजेरी लावतात. पाहुयात या शेकडो वर्ष जुन्या परंपरेविषयी…
जालना मंठा महामार्गावर असलेल्या साळेगाव या गावात चंपाषष्टी नंतरच्या पहिल्या गुरुवारी हा उरूस पार पडतो. आदल्या दिवशी बुधवारी गावातून वाजत गाजत संदल काढली जाते. दुसऱ्या दिवशी नागरिक गणोजी पीराचे दर्शन घेतात आणि आपल्या मनातील सुप्त इच्छांचे प्रकटीकरण करतात. मनातील इच्छा पूर्ण झाली की वेगवेगळ्या प्रकारे नवस फेडले जातात. मग कुणी रेवड्या उधळते तर कुणी बाबाला गल्फ म्हणजेच चादर चढवतात.
advertisement
या प्रकारे दरवर्षी हा उत्सव इथे मोठ्या श्रद्धेने संपन्न होतो. एक दिवसाची यात्रा भरते. परंतु या ठिकाणी कोणत्याही सुविधा नाहीत. लोकप्रतिनिधींनी या देवस्थानासाठी सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी किसन भिसे यांनी केली आहे.
view commentsLocation :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
December 05, 2025 4:35 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
इच्छा पूर्ण झाली की फेडले जातात नवस, जालन्यात शेकडो वर्षांची उरूसाची आहे परंपरा, इतिहास माहितीये का? Video

