गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भविकांची गर्दी; फुलांनी सजावण्यात आला मंदिर परिसर Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भविकांनी पहाटे पासूनच गर्दी केलीय.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : गणेश जयंतीनिमित्त पुण्यासह देशभरात कीर्ती असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भविकांनी पहाटे पासूनच गर्दी केलीय. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात पाहटे पासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं अयोजन करण्यात आलं होत. पहाटे तीन वाजता ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक कारण्यात आला. त्यानंतर किराणा घराण्याच्या गायिका पद्मा देशपांडे यांनी आपली गायन सेवा श्रीगणेशाच्या चरणी अर्पण केली.
advertisement
याशिवाय दिवसभर श्रीसुप्त अभिषेक, गणेश याग, नगर प्रदक्षिणा, आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत. गणेश जयंतीनिमित्त मंदिर आणि मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजावण्यात आला आला आहे. सरपाले बंधूनी ही सजावट केली. मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी 12 वाजता होणार असून यावेळी पुष्पवृष्टी देखील होणार आहे. यंदा देखील सुवर्ण पाळण्यात हा गणेशजन्म सोहळा पार पडणार आहे.
advertisement
माघी गणेश उत्सव का साजरा होतो?
'चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरू होत आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेश जयंती’म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. माघी महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्म झाला आणि या दिवशी त्यांची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, अशी अख्यायिका सांगितली जाते.
Location :
Pune,Pune,Maharashtra
First Published :
February 13, 2024 11:00 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भविकांची गर्दी; फुलांनी सजावण्यात आला मंदिर परिसर Video