Navratri 2023: घटस्थापनेसाठी आज 46 मिनिटांची शुभ वेळ; पहिल्या दिवसाची संपूर्ण पूजा-विधी जाणून घ्या
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Navratri 2023: हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस विशेष मानले जातात आणि या काळात दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते.
मुंबई, 15 ऑक्टोबर : आजपासून म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. यंदा 22 ऑक्टोबरला अष्टमी आणि 23 ऑक्टोबरला नवमी साजरी होणार आहे. हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस विशेष मानले जातात आणि या काळात दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. माता पार्वतीला शैलपुत्री म्हणतात, कारण तिचे वडील हिमालय पर्वतराज आहेत. गोऱ्या रंगाची माता शैलपुत्री बैलावर स्वार होऊन येते. तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळाचे फूल आहे. चंद्र त्यांच्या मस्तकाचे सौंदर्य वाढवतो.
पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करण्याला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीत कलशाची स्थापना केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. नवरात्रीची सुरुवात कलशाच्या स्थापनेने होते. याला घटस्थापना म्हणतात. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून देवी शैलपुत्रीची पूजा पद्धती आणि मंत्र जाणून घेऊ. यासोबतच पहिल्या दिवशी कलश स्थापनेचा शुभ मुहूर्तही पाहू.
या शुभ मुहूर्तावर कलशाची स्थापना करा - 
ज्योतिषांच्या मते, यावेळी शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.44 ते दुपारी 12.30 पर्यंत आहे. कलश स्थापित करण्यासाठी तुम्हाला 46 मिनिटांचा वेळ मिळेल. यावेळी अभिजीत मुहूर्त आहे. नवरात्रीच्या दरम्यान कलश स्थापित करणार असाल आणि संपूर्ण नऊ दिवस उपवास करणार असाल तर शुभ मुहूर्त लक्षात ठेवा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाच्या स्थापनेसह शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. कलशाची स्थापना केल्याने माता दुर्गा प्रसन्न होऊन सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, अशी श्रद्धा आहे. यामुळे भाविकांचे सर्व संकटे दूर होतात.
advertisement
पहिल्या दिवशी या मंत्रांचा जप करा
देवी शैलपुत्रीच्या मंत्राची पूजा करा -
ॐ देवी शैलपुत्र्यै नमः
देवी शैलपुत्रीचा प्रार्थना मंत्र -
वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्॥
देवी शैलपुत्रीचा बीज मंत्र -
ह्रीं शिवायै नम:
देवी शैलपुत्रीची उपासना पद्धत -
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केल्यानंतर देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. शैलपुत्रीची पूजा करण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी उठून स्नान करून ध्यान करावे. यानंतर, तुमचे पूजास्थान/देव्हारा स्वच्छ करा. त्यानंतर पूजा कक्षात एक चौरंग/पाट ठेवून त्यावर गंगाजल शिंपडावे. यानंतर त्यावर लाल रंगाचे कापड पसरून त्यावर मातेची सर्व रूपे स्थापित करा. आता शैलपुत्री मातेची पूजा करताना व्रत करण्याचा संकल्प घ्यावा. माता राणीला अक्षत, धूप, दिवा, फुले, फळे, मिठाई, नैवेद्य इत्यादी अर्पण करा. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी माता शैलपुत्रीला कणेरची फुले अर्पण करा आणि गाईचे तूप अर्पण करा. पूजेच्या वेळी देवी शैलपुत्रीच्या मंत्रांचा जप करा. शेवटी तुपाचा दिवा लावून मातेची आरती करावी. जर तुमच्या कुंडलीत चंद्राचा दोष असेल किंवा चंद्र कमजोर असेल तर तुम्ही देवी शैलपुत्रीची विशेष पूजा करावी. याचा खूप फायदा होईल.
advertisement
शैलपुत्रीची आरती -
शैलपुत्री मां बैल पर सवार। करें देवता जय जयकार।
शिव शंकर की प्रिय भवानी। तेरी महिमा किसी ने ना जानी।
पार्वती तू उमा कहलावे। जो तुझे सिमरे सो सुख पावे।
ऋद्धि-सिद्धि परवान करे तू। दया करे धनवान करे तू।
advertisement
सोमवार को शिव संग प्यारी। आरती तेरी जिसने उतारी।
उसकी सगरी आस पुजा दो। सगरे दुख तकलीफ मिला दो।
घी का सुंदर दीप जला के। गोला गरी का भोग लगा के।
श्रद्धा भाव से मंत्र गाएं। प्रेम सहित फिर शीश झुकाएं।
जय गिरिराज किशोरी अंबे। शिव मुख चंद्र चकोरी अंबे।
advertisement
मनोकामना पूर्ण कर दो। भक्त सदा सुख संपत्ति भर दो।
मां शैलपुत्री की जय…मां शैलपुत्री की जय…मां शैलपुत्री की जय!
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2023 10:11 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Navratri 2023: घटस्थापनेसाठी आज 46 मिनिटांची शुभ वेळ; पहिल्या दिवसाची संपूर्ण पूजा-विधी जाणून घ्या


