गुढी पाडव्यावर अमावस्येच सावट, चुकूनही 'या' वेळेत उभारू नका गुढी; कोणती वेळ ठरणार योग्य?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
19 मार्च 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू नववर्षाचे स्वागत 'गुढीपाडव्याच्या' निमित्ताने केले जाणार आहे. मात्र, यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अमावास्येचे सावट असल्याने भाविकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.
Gudi Padwa Shubh Muhurt : 19 मार्च 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू नववर्षाचे स्वागत 'गुढीपाडव्याच्या' निमित्ताने केले जाणार आहे. मात्र, यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अमावास्येचे सावट असल्याने भाविकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. पंचांगानुसार, अमावास्येची तिथी आणि प्रतिपदेचा प्रारंभ यामध्ये काही मिनिटांचा फरक असल्याने गुढी नेमकी कधी उभारावी, हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे. चुकीच्या वेळी गुढी उभारणे वास्तूशास्त्रानुसार अशुभ मानले जाऊ शकते.
अमावस्येचे सावट आणि तिथीचा घोळ
यंदा फाल्गुन अमावस्या, म्हणजेच दर्श अमावस्या ही 18 मार्च रोजी सकाळी 08:25 वाजता सुरू झाली असून ती 19 मार्च रोजी सकाळी 06:52 वाजेपर्यंत असणार आहे. शास्त्रानुसार, अमावस्या हा काळ पितृ कर्मासाठी आणि चिंतनासाठी असतो, तो कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा विजयाचे प्रतीक असलेल्या 'गुढी'साठी योग्य मानला जात नाही. त्यामुळे 19 मार्चला सूर्योदय झाला तरी, जोपर्यंत अमावस्या संपत नाही, तोपर्यंत गुढी उभारणे टाळावे. सकाळी 06:52 नंतरच खऱ्या अर्थाने 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' सुरू होईल.
advertisement
'ही' वेळ ठरेल शुभ; चुकूनही करू नका घाई
अनेकांना सूर्योदयाबरोबर गुढी उभारण्याची सवय असते, पण उद्या सूर्योदय सकाळी 06:26 ला होईल, तर अमावस्या 06:52 ला संपेल. सकाळी 06:26 ते 06:25 या वेळेत गुढी उभारणे टाळावे, कारण या काळात अमावस्येचा प्रभाव असेल. सकाळी 06:54 ते सकाळी 08:14 ही वेळ गुढी उभारण्यासाठी सर्वात 'अचूक' आणि 'शुभ' मानली गेली आहे. या काळात प्रतिपदा तिथी पूर्णपणे सक्रिय असेल.
advertisement
दुपारचे मुहूर्त आणि विधी
जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळी गुढी उभारता आली नाही, तर घाबरण्याचे कारण नाही. गुढीपाडवा हा 'साडेतीन मुहूर्तांपैकी' एक असल्याने संपूर्ण दिवस शुभ असतो. गुढी उभारण्यासाठी दुपारी 12:04 ते 12:53 ही वेळ देखील अत्यंत लाभदायक आहे. तर दुपारी 12:46 ते 02:17 या वेळातही तुम्ही पूजन करू शकता. अमावस्या संपल्यानंतर तुम्ही घर स्वच्छ करून, रांगोळी काढून विजयाची गुढी थाटात उभारू शकता.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 6:54 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
गुढी पाडव्यावर अमावस्येच सावट, चुकूनही 'या' वेळेत उभारू नका गुढी; कोणती वेळ ठरणार योग्य?






