Guru Purnima 2025: शिर्डीतील गुरुपौर्णिमा, साई भक्ताचा अनोखा उपक्रम, 1800 फोटोंचा तो खजिना खुला!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Aishwarya Ramnath Taskar
Last Updated:
Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साईंबाबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. सुरत येथील साई भक्ताने साईबाबांच्या 1800 हून अधिक फोटोंचे प्रदर्शन भरवले.
शिर्डी: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीत तीन दिवसीय उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. यंदा याच पर्वाचे औचित्य साधत श्री साईबाबा संस्थानच्यावतीने भाविकांसाठी खास पर्वणी उपलब्ध करून देण्यात आलीये. सुरत येथील साईभक्त जिग्नेश राजपूत यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून साकार झालेल्या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. साईबाबा आणि त्यांच्याशी संबंधित 1800 हून अधिक फोटोंचे प्रदर्शन भरवण्यात आले असून ही दुर्मिळ छायाचित्रे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होतेय.
साई भक्त रजपुत यांनी साईबाबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. साईबाबा हयात असल्यापासूनच्या छायाचित्रांची सामग्री करत त्याचबरोबर पुस्तकांमधून आणि सोशल मीडियाहून सर्व जुने आणि नवीन फोटो एकत्र करत जवळपास 1800 ते 2000 फोटोंचे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सुरत येथील साईभक्ताने साईबाबांच्या जुन्या आणि नवीन आठवणींना उजाळा दिलाय. साईभक्त जिग्नेश यांनी त्यांच्या टीम सोबत मिळून गेल्या पंधरा वर्षापासून यावर काम करत या प्रदर्शनाची तयारी केली आहे.
advertisement
प्रदर्शनात काय पाहाल?
या प्रदर्शनात श्री साईबाबांचे समकालीन भक्त, तसेच संस्थानमध्ये काळानुसार झालेल्या बदलांचे सुमारे 2 हजार छायाचित्रांच्या माध्यमातून दर्शन घडवले आहे. हे भव्य प्रदर्शन श्री साई मंदिर परिसरात भरविण्यात आले असून दर्शनाला येणारे सर्व साई भक्त छायाचित्र प्रदर्शन अत्यंत भावुक होऊन पाहात आहेत.
advertisement
कधी पाहाता येणार प्रदर्शन?
शिर्डीतील साईबाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन प्रदर्शन गुरुपौर्णिमा उत्सवाच्या संपूर्ण कालावधीत भाविकांसाठी खुलं राहणार आहे. यातून साईबाबांची जुनी शिर्डी ते नवी शिर्डी पर्यंतचा प्रवास दाखवला आहे. अधिकाधिक साईभक्त आणि ग्रामस्थांनी या अनोख्या प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत, असे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.
Location :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
July 10, 2025 9:23 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Guru Purnima 2025: शिर्डीतील गुरुपौर्णिमा, साई भक्ताचा अनोखा उपक्रम, 1800 फोटोंचा तो खजिना खुला!