घराचे दरवाजे 'या' दिशांना उघडत असतील, तर व्हा सावध! सुख-समृद्धी हवी असेल तर करा 'हे' बदल, अन्यथा...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार, घराचा दरवाजा केवळ भौतिक प्रवेशाचं नाही तर सकारात्मक ऊर्जेचं आणि शुभतेचंही प्रवेशद्वार असतो. मुख्य दरवाजा मोठा, डबल आणि घरात उघडणारा असावा. दरवाजांपासून...
घराचा मुख्य दरवाजा केवळ ये-जा करण्याचा मार्ग नसून तो सुख आणि समृद्धीच्या प्रवेशाचे माध्यम आहे. याच ठिकाणाहून तुम्हीच नव्हे, तर सकारात्मक ऊर्जा आणि शुभ परिणाम देखील तुमच्यासोबत घरात प्रवेश करतात. अनेकदा लोकांना असे वाटते की घराचा मुख्य दरवाजा वास्तुनुसार असेल तर सर्व ठीक आहे. पण सत्य हे आहे की, घरातील इतर दरवाजेही तितकेच महत्त्वाचे असतात. ज्योतिषी आणि वास्तूशास्त्र तज्ञ रवी पराशर दारांच्या वास्तू आणि त्यांचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम याबद्दल माहिती देत आहेत.
दारांची संख्या
वास्तूशास्त्र आणि ज्योतिषानुसार, दारांची संख्या विषम असावी, जसे की 3, 5, 7, 9 किंवा 11. विषम संख्या ऊर्जेचा प्रवाह संतुलित ठेवतात.
कोणता दरवाजा मोठा असावा?
अनेकदा घरांना एक मुख्य दरवाजा असतो ज्यातून आपण घरात प्रवेश करतो. लक्षात ठेवा की, हा मुख्य प्रवेशद्वार सर्वात मोठा आणि दुहेरी असावा. कारण हा तो दरवाजा आहे ज्यातून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. इतर दरवाजे एकेरी असले तरी चालतील, पण प्रवेशद्वार आकार आणि रुंदीमध्ये सर्वात मोठे असावे.
advertisement
दरवाजा कोणत्या दिशेला उघडायला हवा?
याकडे फार कमी लोक लक्ष देतात. लक्षात ठेवा की, दरवाजा नेहमी आतल्या बाजूला उघडायला हवा. असे नसावे की पाहुणा आला आणि दरवाजा बाहेरच्या बाजूला उघडत असल्याने त्याला दोन पाऊले मागे घ्यावे लागली. वास्तुनुसार हे चांगले मानले जात नाही. यामुळे घरात आर्थिक समस्या येतात आणि घरातील लोकांना प्रगतीसाठी खूप संघर्ष करावा लागतो.
advertisement
दाराचा आवाज शुभ की अशुभ?
कधीकधी, जेव्हा दरवाजे उघडले जातात, तेव्हा कर्कश आवाज येतो. असे आवाज ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणतात. असे असल्यास, दरवाजे दुरुस्त करून घ्या जेणेकरून आवाज बंद होईल. कधीकधी, दारांवर जुन्या पद्धतीच्या लोखंडी साखळ्यांसारख्या गोष्टी असतात, ज्या अशुभ मानल्या जातात.
वास्तूशास्त्रानुसार, दक्षिण आणि पश्चिम दिशेतील दारांची संख्या कमीतकमी असावी. जर घरात दोन प्रवेशद्वार असतील, एक उत्तर दिशेला आणि दुसरे नैऋत्य दिशेला, तर खात्री करा की उत्तर दिशेचा दरवाजा मोठा आहे आणि नैऋत्य दिशेचा दरवाजा लहान आहे. यामुळे उत्तर दिशेकडून सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश वाढेल आणि नकारात्मक ऊर्जेचा बाहेर जाणारा प्रवाह संतुलित राहील.
advertisement
मंगल कलश
हा कलश शुक्र आणि चंद्राच्या प्रभावांचे प्रतिनिधित्व करतो. तो मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मंगल कलश ठेवला असेल, तर लक्षात ठेवा की, कलशाचे तोंड उघडे आणि मोठे असावे. त्यात स्वच्छ पाणी भरा आणि शक्य असल्यास फुलांच्या पाकळ्या टाका. जर तुमच्याकडे पारंपरिक कलश नसेल, तर तुम्ही मोठ्या तोंडाच्या भांड्यात पाणी भरून दाराजवळ ठेवू शकता. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि सकारात्मकता पसरते. हे छोटे उपाय तुमच्या घराला शांती, सौभाग्य आणि समृद्धीचे केंद्र बनवू शकतात.
advertisement
हे ही वाचा : घरात सतत वाद होतात? तर करा 'हे' 5 ज्योतिषी उपाय; नाती सुधारतील अन् आर्थिक अडचणीही दूर होतील!
हे ही वाचा : गरिबीतून व्हाल अचानक श्रीमंत! फक्त गुप्तपणे दान करा 'या' 5 गोष्टी; पैशांचा प्रश्न कायमचा मिटेल आणि...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 22, 2025 11:38 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
घराचे दरवाजे 'या' दिशांना उघडत असतील, तर व्हा सावध! सुख-समृद्धी हवी असेल तर करा 'हे' बदल, अन्यथा...