तुमच्या मृत्यू कसा होईल हे तुमच्या तळहाताच्या रेषेवरून समजेल, असे मिळतील संकेत

Last Updated:

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं अंतिम सत्य मृत्यू आहे. माणूस जन्माला आला तरी त्याचा मृत्यू निश्चित असतो. हे अंतिम सत्य असूनही स्वतःचा मृत्यू कसा होईल, या विचाराने अनेकजण घाबरतात.

News18
News18
मुंबई, 12 ऑक्टोबर : ज्योतिषशास्त्रामध्ये हस्तसामुद्रिक ही भविष्य बघण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमधली एक लोकप्रिय पद्धत आहे. तळहातांवरच्या रेषा, उंचवटे यांच्या अभ्यासातून ही पद्धत विकसित झाल्याचं मानलं जातं. हस्तरेषेवरून तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं वागणं, स्वभाव, करिअर, प्रेम जीवन आदी कळू शकतं. शिवाय हस्तरेषा पाहून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कसा होईल, तिचं आयुष्य किती असेल, हे देखील सांगता येतं.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचं अंतिम सत्य मृत्यू आहे. माणूस जन्माला आला तरी त्याचा मृत्यू निश्चित असतो. हे अंतिम सत्य असूनही स्वतःचा मृत्यू कसा होईल, या विचाराने अनेकजण घाबरतात. पण तुम्हाला माहिती आहे का, एखादा व्यक्तीचा मृत्यू कसा होईल, या प्रश्नाचं उत्तर त्या व्यक्तीची तळहातावरील जीवनरेषा पाहून देता येतं. पंडित आशिष उपमन्यू यांच्या मते, हातावरील जीवनरेषा त्या व्यक्तीचा मृत्यू कसा होईल, याचा संकेत देते. हस्तरेषाशास्त्रात याचा तपशीलवार उल्लेख असून, आज आम्ही तुम्हाला त्याबाबत माहिती देणार आहोत, ‘नई दुनिया डॉट कॉम’ने या बाबत वृत्त दिलंय.
advertisement
जीवनरेषा जाड व खोल असणं
हस्तरेषाशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील जीवनरेषा सुरुवातीला खूप खोल आणि जाड असेल, परंतु हळूहळू ती बारीक होत असेल, तर अशा व्यक्तीचा मृत्यू प्रदीर्घ आजारानं कमी वयात होतो. अशा व्यक्तीला आयुष्यात मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागतं.
फुली चिन्ह असेल तर...
हस्तरेषाशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील जीवनरेषेला दुसऱ्या रेषेचा अडथळा आला असेल, किंवा इतर कोणत्याही रेषेनं तिथे फुलीचं चिन्ही निर्माण होत असेल, तर अशा व्यक्तीचा अचानक मृत्यू होतो. अशी व्यक्ती फार काळ जगत नाहीत. या शिवाय जर एखाद्या व्यक्तीच्या हातातील जीवनरेषेच्या शेवटी ठिपक्यासारखं चिन्ह असेल, तर त्याचा रस्ते अपघातात मृत्यू होऊ शकतो.
advertisement
जीवनरेषेवर चांदणी
हस्तरेषाशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावरील जीवनरेषेवर चांदणीचे चिन्ह असेल, तर अशा लोकांचा मृत्यू नैसर्गिक होत नाही, उलट हे लोक अकाली मृत्यूचे बळी ठरतात. असे लोक रोगराई, आत्महत्या, खून इत्यादीमुळे मरतात.
दरम्यान, असं म्हणतात की माणसाचं नशीब त्याच्या हातावरून कळतं. हस्तरेषा शास्त्रानुसार, तुम्ही तुमच्या हातच्या रेषांवरून एखाद्या व्यक्तीचं आयुष्य, संपत्ती, वैवाहिक जीवन, प्रेम जीवन यासह त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ शकता. अर्थात त्यावर कितपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
तुमच्या मृत्यू कसा होईल हे तुमच्या तळहाताच्या रेषेवरून समजेल, असे मिळतील संकेत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement