Ashadhi Ekadashi 2025: सोलापूरच्या तरुणाची कमाल, तांदळावर साकारली विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा, video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथील तरुणाने आषाढी एकादशी निमित्त चक्क तांदळावर विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा साकारली आहे.
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथील तरुणाने आषाढी एकादशी निमित्त चक्क तांदळावर विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा साकारली आहे. काशिनाथ मल्लिनाथ तावस्कर तांदळाच्या खड्यावर विठ्ठल-रुक्मिणीचे हुबेहूबचित्र काढणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या संदर्भात अधिक माहिती काशिनाथ तावस्कर यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
आषाढी एकादशी निमित्ताने सोलापुरातील काशिनाथ मल्लिनाथ तावस्कर वय 26 या तरुणाने तांदळाच्या दोन दाण्यांवर कला आणि श्रद्धा याचा मिलाप करत विठ्ठल-रुक्मिणीची सुबक प्रतिमा रेखाटली आहे. तर अगदी लहानशा छोट्या तांदळाच्या दाण्यांवर प्रतिमा साकारण्याचा हा मल्लिनाथ तावस्कर यांचा पहिलाच प्रयत्न आहे.
advertisement
जेवण करताना काशिनाथ यांना दोन तांदळाचे दाणे चिटकलेले दिसले आणि त्यावर त्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणी यांची प्रतिमा साकारण्याचा निर्णय घेतला. ही प्रतिमा रेखाटण्यासाठी जवळपास दोन ते तीन तासांचा कालावधी लागला. तांदळाच्या दाण्याचा आकार अगदी लहान असतो, त्यावर पेन्सिलने चित्र काढणे अशक्य असते. म्हणून त्यांनी रंगकामातून विठ्ठल रुक्मिणीचे रूप साकारले आहे.
advertisement
सोलापुरातील तरुणाने तांदळाच्या दाण्यावर विठ्ठल-रुक्मिणीचे चित्र रेखाटून सर्व विठ्ठल भक्तांपर्यंत एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. तो म्हणजे हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादला विचारले होते की, देव कुठे आहे ? तेव्हा भक्त प्रल्हादाने सांगितले की या चराचरामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये देवत्व समावलेले आहे. तर काशिनाथ तावस्कर आतापर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, साईबाबा यांचे चित्र रेखाटले आहे. तर बी.एस.सी पर्यंत शिक्षण घेतलेले काशिनाथ तावस्कर हे पुण्यात आर्ट क्लासेस चालवत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 05, 2025 4:05 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadhi Ekadashi 2025: सोलापूरच्या तरुणाची कमाल, तांदळावर साकारली विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा, video