Upvas Papad Chaat: उपवासाच्या पापडाची तीच चव चाखून कंटाळलात? आषाढी एकादशीला बनवा पापड चाट, आवडीने खाल

Last Updated:

उपवासाच्या पापडाची तीच ती चव चाखून कंटाळला असाल तर तुम्ही उपवासाची पापड चाट बनवू शकता. अगदी कमीत कमी साहित्यात ही पापड चाट तयार होते. 

+
Fasting

Fasting Papad Chaat 

अमरावती: उपवास म्हटलं की, आपण साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर, शिरा अशा प्रकारचे पदार्थ बनवतो. त्याचबरोबर उपवासाचे पापड सुद्धा आपण या आहारात घेत असतो. पण, पापड तसेच खाताना थोडा कंटाळा येतो. उपवासाच्या पापडाची तीच ती चव चाखून कंटाळला असाल तर तुम्ही उपवासाची पापड चाट बनवू शकता. अगदी कमीत कमी साहित्यात ही पापड चाट तयार होते. तुम्हाला आवडत असणारे उपवासाचे सर्वच पदार्थ तुम्ही या चाटमध्ये टाकू शकता. आषाढी एकादशी उपवासाची पापड चाट कशी तयार करायची जाणून घेऊयात.
पापड चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य 
साबुदाणा पापड किंवा आलूचे पापड तळून घेतलेले, शिजवलेला बटाटा, बारीक केलेले चिप्स, अनार दाणे, पिठी साखर, मीठ, लाल तिखट आणि लिंबू हे साहित्य लागेल. तुम्हाला लागत असल्यास आणखी काही साहित्य तुम्ही घेऊ शकता.
advertisement
उपवासाची पापड चाट तयार करण्याची कृती
 सर्वात आधी तुम्हाला लागत असलेले पापड तळून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आलू किंवा साबुदाणा पापड घेऊ शकता. त्यानंतर त्यावर शिजवून घेतलेला बटाटा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडं लाल तिखट टाकून घ्यायचं. मीठ टाकून घ्यायचं. पिठी साखर टाकून घ्यायची.
advertisement
ते सर्व साहित्य व्यवस्थित लावून झाल्यावर त्यावर बारीक केलेले चिप्स टाकून घ्यायचे. त्यानंतर अनार दाणे टाकून घ्यायचे. चवीपुरतं लिंबू पिळून घ्यायचं. हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर त्यावर पुन्हा लाल तिखट, मीठ आणि पिठी साखर टाकून घ्यायची आहे. चटपटीत अशी उपवासाची पापड चाट तयार झालेली असेल. ही चाट तुम्हाला खाण्याच्या वेळी बनवायची आहे. आधीच बनवून ठेवली तर पापड नरम पडतात
मराठी बातम्या/रेसिपी/
Upvas Papad Chaat: उपवासाच्या पापडाची तीच चव चाखून कंटाळलात? आषाढी एकादशीला बनवा पापड चाट, आवडीने खाल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement