Maghi amavasya 2024: रविवारी माघी अमावस्या! या 4 गोष्टी केल्यानं कालसर्प दोष, पितृदोषातून व्हाल मुक्त
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Maghi amavasya 2024: माघ महिन्यात येणाऱ्या अमावास्येला काही विशेष कामे केली तर शुभ फळ मिळतात. माघी अमावस्येला कोणत्या गोष्टी कराव्या? ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा या विषयावर सांगत आहेत.
मुंबई : सनातन धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. पितृपूजेसाठी अमावस्येचा दिवस अतिशय शुभ आहे. याशिवाय तंत्र साधना करणाऱ्यांसाठीही हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी साधना केल्यानं अनेक प्रकारची सिद्धी आणि विशेष फल प्राप्त होते. या वर्षी माघ महिन्याची अमावस्या 10 मार्च 2024 रोजी रविवारी आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्याने अनेक प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते.
माघ महिन्यात येणाऱ्या अमावास्येला काही विशेष कामे केली तर शुभ फळ मिळतात. माघी अमावस्येला कोणत्या गोष्टी कराव्या? ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा या विषयावर सांगत आहेत.
माघी अमावस्येला करा ही कामे -
हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, फाल्गुन महिन्यातील अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दान केल्यानं पुण्य प्राप्त होते. या दिवशी एखाद्या पवित्र नदीवर जाऊन स्नान करणे शक्य नसेल तर घरातील स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.
advertisement
पितृपूजेसाठी अमावस्या दिवस विशेष मानला जातो. या दिवशी आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पिंडदान, तर्पण आणि विधींसह गरजूंना दान करावे.
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर अमावस्या तिथीला स्नान आणि दान करून चांदीच्या नागाच्या जोडीला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करावीत. त्यानंतर ही जोडी वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. असे केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते. अमावस्येच्या दिवशी गरजूंना दान करा आणि मुंग्यांना पीठ खाऊ घालणे शुभ मानले जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 09, 2024 7:33 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Maghi amavasya 2024: रविवारी माघी अमावस्या! या 4 गोष्टी केल्यानं कालसर्प दोष, पितृदोषातून व्हाल मुक्त


