Mahabharat: 5 पांडवांपैकी 'या' पांडवाची पत्नी होती जलपरी, तिनंच त्याला केलं होतं पुन्हा जिवंत!

Last Updated:

5 पांडवांची एक पत्नी होती द्रौपदी. परंतु त्यांनी दुसऱ्या महिलांशीही विवाह केला होता. एका पांडवाची पत्नी तर जलपरी होती. त्यासोबतच ती अनेक विद्यांची जाणकार होती. ती नेमकी कोण होती आणि कोणत्या पांडवाची पत्नी होती, जाणून घेऊया.

News18
News18
मुंबई : महाभारतातील काही गोष्टी अशा आहेत की, ज्यांची कधीच चर्चा होत नाही. 5 पांडवांची एक पत्नी होती द्रौपदी. परंतु त्यांनी दुसऱ्या महिलांशीही विवाह केला होता. एका पांडवाची पत्नी तर जलपरी होती. त्यासोबतच ती अनेक विद्यांची जाणकार होती. ती नेमकी कोण होती आणि कोणत्या पांडवाची पत्नी होती, जाणून घेऊया.
5 पांडवांपैकी 1 असलेल्या अर्जुनाचे 3 पुत्र होते. द्रौपदीनं जन्म दिलेल्या पुत्राचं नाव होतं श्रुतकर्मा. द्रौपदीसह सुभद्रा, उलूपी आणि चित्रांगदा यादेखील अर्जुनाच्या पत्नी होत्या. सुभद्राचा मुलगा होता अभिमन्यू, उलूपीचा इरावन आणि चित्रांगदाच्या पुत्राचं नाव होतं बभ्रुवाहन. असं म्हणतात की, अर्जुनाचा अंत त्याच्याच पुत्राकडून झाला होता. परंतु उलूपीनं त्याला पुन्हा जीवंत केलं होतं.
advertisement
कोण होती उलूपी?
अर्जुनच्या चौथ्या पत्नीचं नाव होतं जलपरी नागकन्या उलूपी. ही ऐरावत वंशाच्या कौरव्य नामक नागाची कन्या होती. मान्यतेनुसार, तिचं लग्न एका वाघाशी झालं होतं ज्याला गरुडानं मारून खाल्लं. त्यामुळे ती विधवा झाली होती. तिची आणि अर्जुनाची भेट गंगाद्वारावर झाली. उलूपी अर्जुनाला पाहताक्षणी त्याच्या प्रेमात पडली होती. ती अर्जुनाला पाताळ लोकांत घेऊन गेली. तिनं त्याला लग्नाची मागणी घातली आणि त्यांचं लग्न झालं.
advertisement
असं म्हणतात की, द्रौपदी जी पाचही पांडवांची पत्नी होती, ती 1-1 वर्षभर प्रत्येक पांडवासोबत राहायची. महत्त्वाचं म्हणजे एका पांडवासोबत असताना दुसऱ्या पांडवांना द्रौपदीच्या आजूबाजूला फिरकण्याचीही परवानगी नव्हती. हा नियम मोडणाऱ्याला वर्षभर देशाबाहेर राहण्याची शिक्षा मिळत असे.
अर्जुन आणि द्रौपदीची वर्षभराची अवधी नुकतीच संपली होती आणि द्रौपदीचा युधिष्ठिरसोबत राहण्याचा कालावधी सुरू झाला होता. त्यावेळी अर्जुन चुकून आपलं तीर, धनुष्य द्रौपदीच्या घरीच विसरला. एका दुष्ट व्यक्तीपासून पशूंच्या रक्षणासाठी त्याला तीर, धनुष्याची आवश्यकता होती. क्षत्रिय धर्माचं पालन करत त्यानं तीर-धनुष्य घेण्यासाठी नियम मोडून द्रौपदीच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याला वर्षभर बाहेर राहण्याची शिक्षा मिळाली. यादरम्यान अर्जुनाची भेट उलूपीशी झाली. दोघं लग्नानंतर वर्षभर एकत्र राहिले, मग अर्जुन पुन्हा आपल्या राज्यात परतला.
advertisement
उलूपीनं अर्जुनाला पाण्यात कोणत्याही हानीशिवाय राहण्याचं वरदान दिलं होतं. महाभारत युद्धात आपले गुरू भीष्म पितामह मारले गेल्यानंतर जेव्हा अर्जुनाला ब्रह्मा-पुत्राचा शाप मिळाला तेव्हा उलूपीनंच त्याला शापमुक्त केलं होतं. अर्जुनाचा अंत त्याचा पुत्र मणीपूर नरेश बभ्रुवाहन (चित्रांगदाचा पुत्र) याच्याद्वारे होताच उलूपीनं संजीवन मणिकाद्वारा अर्जुनाला पुनर्जिवीत केलं होतं. विष्णू पुराणानुसार अर्जुन आणि उलूपीचा इरावन नामक पुत्र होता. इरावनलाच तृतीयपंथी व्यक्ती देवता मानतात. उलूपी स्वर्गारोहणापर्यंत अर्जुनासोबत होती, असं म्हणतात.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahabharat: 5 पांडवांपैकी 'या' पांडवाची पत्नी होती जलपरी, तिनंच त्याला केलं होतं पुन्हा जिवंत!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement