कितीही इच्छा असेल तरीही संक्रांतीच्या दिवशी नेसू नका 'या' रंगाची साडी, अन्यथा चूक पडेल महागात
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू संस्कृतीतील नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे 'मकरसंक्रांत'. हा सण सुवासिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. संक्रांतीला काळं वस्त्र नेसण्याची जुनी परंपरा असली, तरी दरवर्षी संक्रांतीचे वाहन आणि तिची वैशिष्ट्ये पाहून शुभ रंग ठरवले जातात.
Makar Sankranti : हिंदू संस्कृतीतील नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे 'मकरसंक्रांत'. हा सण सुवासिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. संक्रांतीला काळं वस्त्र नेसण्याची जुनी परंपरा असली, तरी दरवर्षी संक्रांतीचे वाहन आणि तिची वैशिष्ट्ये पाहून शुभ रंग ठरवले जातात. यंदा 14 जानेवारी 2026 रोजी साजरी होणाऱ्या मकरसंक्रांतीला नेमके कोणते रंग परिधान करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबद्दल महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
यंदा कोणत्या रंगाच्या साड्या परिधान कराव्यात?
मकरसंक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसणे हे सर्वात शुभ मानले जाते. यामागील शास्त्रीय कारण असे की, संक्रांत साधारणपणे कडाक्याच्या थंडीत येते. काळा रंग उष्णता शोषून घेतो, ज्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते. त्याच बरोबर काळा रंग सोडल्यास, तुम्ही हिरवा, लाल, केशरी किंवा गुलाबी रंगाची साडी नेसू शकता.
advertisement
कोणत्या रंगाची साडी नेसू नये?
यंदा मकरसंक्रांतीबाबत विशेष टीप दिली जात आहे की, महिलांनी पिवळ्या रंगाची साडी नेसणे टाळावे. याचे मुख्य कारण म्हणजे, 2026 च्या संक्रांती देवीचे वाहन किंवा उपवाहन यापैकी एकाचे रंग आणि तिने परिधान केलेली वस्त्रे पाहिली जातात. पंचांगानुसार, यंदा संक्रांतीने ज्या रंगाची वस्त्रे धारण केली आहेत, तो रंग सामान्य जनतेने परिधान करणे अशुभ मानले जाते. यामुळे त्या रंगाचा प्रभाव जीवनावर नकारात्मक पडू शकतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात?
संक्रांतीच्या दिवशी हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणे सर्वोत्तम मानले जाते. हिरवा रंग हा सौभाग्याचा आणि मांगल्याचा प्रतीक आहे. काळ्या साडीवर हिरवा चुडा उठून दिसतोच, शिवाय तो आध्यात्मिक दृष्ट्याही सकारात्मक ऊर्जा देणारा ठरतो. याशिवाय तुम्ही लाल किंवा साडीला मॅचिंग असणाऱ्या बांगड्या घालू शकता, पण काळ्या रंगाच्या बांगड्या घालणे टाळावे. तसेच, मकर संक्रांतीला जर तुम्ही बांगड्या भरणार असाल तर एका हातात एक बांगडी अधिक घालावी.
advertisement
लाखाच्या बांगड्यांचेमहत्त्व काय?
मकरसंक्रांतीला आणि हळदीकुंकवाला अनेक महिला 'लाखाच्या बांगड्या' परिधान करतात किंवा वाण म्हणून देतात. लाख हा एक नैसर्गिक पदार्थ आहे. शास्त्रात लाखाच्या बांगड्यांना अत्यंत पवित्र मानले गेले आहे. असे मानले जाते की, या बांगड्या घातल्याने स्त्रीच्या पतीचे आयुष्य वाढते. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून, लाख त्वचेच्या संपर्कात आल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. लाखाच्या बांगड्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि सुवासिनीचे वाईट नजरेपासून रक्षण करतात, अशी धारणा आहे. महाराष्ट्रात लग्न झालेल्या नवीन सुनेला पहिल्या संक्रांतीला लाखाचे दागिने किंवा बांगड्या देण्याची प्रथा आजही मोठ्या अभिमानाने पाळली जाते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 2:26 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
कितीही इच्छा असेल तरीही संक्रांतीच्या दिवशी नेसू नका 'या' रंगाची साडी, अन्यथा चूक पडेल महागात







