Masik Shivratri 2025: वर्षातील पहिली मासिक शिवरात्री! या उपायांनी शिवकृपा, कष्टाला नशिबाची साथ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Masik Shivratri 2025: 2025 सालची पहिली मासिक शिवरात्री आज 27 जानेवारीला सोमवारी आहे. सोमवारी मासिक शिवरात्री आल्यानं ती विशेष मानली जात आहे, कारण सोमवार महादेवाच्या पूजेचा वार आहे.
मुंबई : हिंदू धर्मात मासिक शिवरात्रीचे खूप महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, मासिक शिवरात्रीचे व्रत दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला येते. हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. या दिवशी शंकर-पार्वतीची पूजा, व्रत-उपवास केल्यानं सर्व दुःखे आणि संकटे दूर होतात. शिवाची पूजा केल्याने भक्तांना इच्छित लाभ मिळतात. 2025 सालची पहिली मासिक शिवरात्री आज 27 जानेवारीला सोमवारी आहे. सोमवारी मासिक शिवरात्री आल्यानं ती विशेष मानली जात आहे, कारण सोमवार महादेवाच्या पूजेचा वार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मासिक शिवरात्रीच्या दिवशी पूजा करण्यासोबत काही ज्योतिषीय उपाय केले तर महादेवाचे विशेष आशीर्वाद मिळतात. या उपायांबद्दल जाणून घेऊ.
शिवलिंगाचा अभिषेक - मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल, दूध, दही, मध, तूप इत्यादींनी अभिषेक करू शकता. नंतर बेलपत्र, भांग आणि धतुरा अर्पण करावा. दिवा लावा आणि 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करा. या दिवशी गरिबांना अन्न आणि कपडे दान करावित. असे केल्याने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात, असे मानले जाते.
advertisement
व्रत-उपवास - मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करून उपवास करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने मनाला शांती आणि आध्यात्मिक शक्ती मिळते. याशिवाय या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. पूजेनंतर महादेवाला प्रसाद अर्पण करावा, असे केल्याने तुमची इच्छित इच्छा पूर्ण होऊ शकते.
advertisement
अडलेल्या कामांसाठी - काम पूर्ण होण्यापूर्वीच सतत अडचणी येत असतील किंवा अचानक तुमच्या कामात विघ्न आले तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिव मंदिरात दिवा लावावा आणि पांढऱ्या चंदनाने शिवलिंगावर 'ओम' लिहावे. तसेच, शिवलिंगावर शंख अर्पण करा आणि पूजा केल्यानंतर ते घ्या आणि तिजोरीत ठेवा. यामुळे तुमचे काम पूर्ण होऊ शकते, असे मानले जाते.
advertisement
इच्छा पूर्तीसाठी उपाय- मासिक शिवरात्रीला तुमची इच्छा एका कागदावर लिहा आणि ती लाल कापडात बांधा आणि नंतर ती वाहत्या पाण्यात सोडा. असे केल्याने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, असे मानले जाते.
मासिक शिवरात्रीचे महत्त्व -
मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. भगवान शिवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी, भक्त या दिवशी उपवास करतात आणि शिवलिंगाचा अभिषेक करतात. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि शांती येते आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. याशिवाय, शिवरात्रीच्या रात्री जागरण करून शिवमंत्रांचा जप केल्याने भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद मिळतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 27, 2025 7:49 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Masik Shivratri 2025: वर्षातील पहिली मासिक शिवरात्री! या उपायांनी शिवकृपा, कष्टाला नशिबाची साथ


