Tulsi Upay: तुळशीची पानं तोडताना मनात या मंत्राचा करावा जप; इतक्या गोष्टींमध्ये मिळेल लाभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi Tips Marathi: तुळशीची पाने तोडण्याबाबत विशेष काळजी घ्यायला हवी. तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते, त्यामुळे तिचे पाने तोडण्याचे अध्यात्मिक नियम देखील महत्त्वाचे आहेत. हिंदू धर्मात तुळशीची पूजा रात्री न करता दिवसा करण्याची परंपरा आहे.
मुंबई : हिंदू धर्मात तुळशीची विशेष पूजा केली जाते. प्रत्येक घरा-घरात तुळशी वृंदावन असते. तुळशीचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो. तुळशीची पाने तोडण्याबाबत विशेष काळजी घ्यायला हवी. तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते, त्यामुळे तिचे पाने तोडण्याचे नियम देखील महत्त्वाचे आहेत. हिंदू धर्मात तुळशीची पूजा रात्री न करता दिवसा करण्याची परंपरा आहे. जाणून घेऊया ज्योतिषी आचार्य पंडित आलोक पाण्या यांच्याकडून, तुळशी तोडण्याचे नियम काय आहेत? ब्रह्म मुहूर्तावर तुळशीची पाने तोडणे शुभ मानले जाते का?
तुळशीची पाने तोडण्याचे नियम -
ज्योतिष शास्त्रानुसार ब्राह्ममुहूर्तामध्ये तुळशीची पाने तोडणे शुभ मानले जाते, परंतु यासाठी काही नियम आहेत. तुळस तोडण्यापूर्वी मंत्राचा जप करावा. त्यानंतरच तुळशीची पाने तोडावीत. जर तुम्हीही हे केले तर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होण्यास मदत होऊ शकते.
ब्रह्म मुहूर्तावर तुळशीची पाने तोडण्याचे नियम -
ब्रह्म मुहूर्तावर तुळशीची पाने तोडत असाल तर प्रथम स्नान करावे. त्यानंतर तुमच्या प्रिय देवतेची पूजा करा. त्यानंतर तुळशीच्या झाडाची पूजा करून प्रथम फक्त 21 पाने तोडा. असं केल्यानं तुमच्या जीवनात आनंदी घटना घडू शकतील.
advertisement
मंत्रांचा जप -
तुळशीची पाने तोडण्यापूर्वी मंत्रांचा जप करावा. तुळशीला जल अर्पण करताना ‘ओम-ओम’ या मंत्राचा 21 वेळा जप करा. हा मंत्र खूप फायदेशीर मानला जातो. तुळशीची पाने तोडण्याचा मंत्र - ॐ सुभद्राय नम:, मातस्तुलसि गोविन्द हृदयानन्द कारिणी, नारायणस्य पूजार्थं चिनोमि त्वां नमोस्तुते।।
advertisement
तुळशीला जल अर्पण केल्यानं काय फायदे होतात?
तुळशीला जल अर्पण केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते. पानांवर सिंदूर लावावा. त्यामुळे आर्थिक समस्या दूर होतात, असे म्हटले जाते. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. पूजेच्या वेळी घरात दिवा लावल्याने सुख-समृद्धीही मिळते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 26, 2025 5:53 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Tulsi Upay: तुळशीची पानं तोडताना मनात या मंत्राचा करावा जप; इतक्या गोष्टींमध्ये मिळेल लाभ


