पुढच्या मे महिन्यात अनेकजण बोहोल्यावर चढणार, वर्षातले सर्वाधिक शुभ मुहूर्त!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
हिंदू वर्ष 2024-2025 दरम्यान विवाहासाठी एकूण 52 शुभ मुहूर्त आहेत. ते नेमके कोणते याबाबत ज्योतिषी डॉ. कुणाल कुमार झा यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
अभिनव कुमार, प्रतिनिधी
दरभंगा : 28 एप्रिलला शुक्र ग्रह अस्त झाल्यानं मे आणि जून महिन्यात एकही विवाह मुहूर्त नाही. त्यामुळे आता थेट 2 जुलैनंतरच लग्न होतील. तसंच 16 जुलैपासून 12 नोव्हेंबरपर्यंत चतुर्मास असल्यानं तेव्हासुद्धा लग्नासाठी शुभ मुहूर्त नाहीये. असं तब्बल 24 वर्षांनंतर पहिल्यांदा घडलंय की, मे आणि जून महिन्यात लग्नासाठी एकही मुहूर्त नाही.
advertisement
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू वर्ष 2024-2025 दरम्यान विवाहासाठी एकूण 52 शुभ मुहूर्त आहेत. ते नेमके कोणते याबाबत ज्योतिषी डॉ. कुणाल कुमार झा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, नोव्हेंबर महिन्यात 18, 22, 25 आणि 27 या विवाह मुहूर्ताच्या तारखा आहेत. तर, डिसेंबर महिन्यात 1, 2, 5, 6, 11 तारखेला शुभ मुहूर्त आहे.
advertisement
त्यानंतर थेट पुढच्या वर्षी म्हणजेच 2025च्या जानेवारी महिन्यात 16, 19, 20, 23, 24, 29, 30 यापैकी कोणत्याही तारखेला आपण शुभ मुहूर्तावर लग्नगाठ बांधू शकता. ज्याला प्रेमाचा महिना म्हणतात, त्या फेब्रुवारीमध्ये 2, 3, 6, 7, 16, 19, 20, 21, 24, 26 या तारखा लग्नासाठी शुभ आहेत. मार्च महिन्यात 2, 3, 6, 7 तारखेला शुभ मुहूर्तावर लग्न होईल. एप्रिल महिन्यात 16, 18, 20, 21, 23, 25, 30 या तारखांना शुभ मुहूर्त आहे. मे महिन्यात 1, 7, 8, 9, 11, 18, 19, 22, 23, 25, 28 आणि जून महिन्यात 1, 2, 4, 6 तारीख हे लग्नासाठी शुभ दिवस आहेत.
advertisement
म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात 4 आणि डिसेंबरमध्ये 5 असे या 2 महिन्यांमध्ये लग्नासाठी एकूण 9 शुभ मुहूर्त आहेत. तर, जानेवारी महिन्यात 7, फेब्रुवारीमध्ये 10, मार्चमध्ये 4, एप्रिलमध्ये 7 आणि मे महिन्यात सर्वाधिक 11 विवाह मुहूर्त दिलेले आहेत.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Location :
Darbhanga,Bihar
First Published :
May 13, 2024 8:24 PM IST