Navratri 2025: नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा? घट विसर्जन कधी करायचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Navratri 2025: यंदा पंचांगानुसार तृतीया तिथी दोन दिवस राहिल्याने नवरात्र 10 दिवसांची झाली आहे. त्यामुळे देवीची उपासना, उपवास सोडणे आणि घट विसर्जन याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाला 21 ऑक्टोबर 2025 पासून सुरुवात झाली असून यंदा नवरात्र नेहमीच्या 9 नव्हे तर तब्बल 10 दिवसांची आहे. पंचांगातील विशेष तिथीसंयोगामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे उपवास पारण, घट विसर्जन आणि कुमारी पूजनाच्या बाबतीत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत मुंबईतील आदित्य जोशी गुरुजी यांनी माहिती दिलीये.
सर्वसाधारणपणे नवरात्र हा देवी दुर्गेच्या उपासनेसाठी समर्पित 9 दिवसांचा काळ असतो. नवव्या दिवशी देवीची विशेष पूजा होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. मात्र यंदा पंचांगानुसार तृतीया तिथी दोन दिवस राहिल्याने नवरात्र 10 दिवसांची झाली आहे. त्यामुळे देवीची उपासना, उपवास सोडणे आणि घट विसर्जन नेमकं कधी करावं, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
advertisement
या संदर्भात आदित्य जोशी गुरुजी सांगतात की, “नवरात्रात अष्टमी किंवा नवमीला कुमारी पूजन व उपवास पारण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे यंदा जरी नवरात्र 10 दिवसांची असली, तरी देवीची उपासना पहिल्या 9 दिवसांपुरती ठेवावी आणि नवमीला (1 ऑक्टोबर) उपवास पारण करावे, हे शास्त्रसम्मत आहे.”
advertisement
दरम्यान, घट विसर्जन हा विधी विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी करावा, असेही गुरुजी स्पष्ट करतात. त्या दिवशी देवीला निरोप देत तिच्या कृपेची प्रार्थना केली जाते. यंदाच्या वाढीव नवरात्रामुळे भाविकांमध्ये गोंधळ असला तरी, नवमी दिवशी (1 ऑक्टोबर) उपवास पारण व विजयादशमीला (2 ऑक्टोबर) घट विसर्जन करणे हे शास्त्रानुसार योग्य असल्याचे गुरुजी सांगतात.
advertisement
तथापि स्थानिक परंपरा, घरगुती कुलाचार आणि मंदिरांची दिनदर्शिका लक्षात घेता काही ठिकाणी 10 दिवस उपवास केला जातो. त्यामुळे काही भक्त विजयादशमीच्याच दिवशी उपवास पारण करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 01, 2025 12:31 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Navratri 2025: नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा? घट विसर्जन कधी करायचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती