लग्न जुळत नाहीये? केवळ 'इतकं'च करा, मिळेल अनुरूप जोडीदार, लाभेल सुखाची साथ

Last Updated:

वय निघून चाललंय मात्र लग्न जुळत नाहीये, लग्न जुळण्यात अडचणी येतात, अशा व्यक्तींसाठी ही बातमी कामाची आहे.

श्री अविघ्न विनायक गणेश मंदिर हे अष्टविनायकांमध्ये पाचव्या स्थानी आहे.
श्री अविघ्न विनायक गणेश मंदिर हे अष्टविनायकांमध्ये पाचव्या स्थानी आहे.
शुभम मरमट, प्रतिनिधी
उज्जैन, 25 सप्टेंबर : हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणरायाची पूजा केली जाते. सध्या देश-विदेशात धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होतोय. भक्तिभावाने, मोठ्या आपुलकीने सर्वजण एकमेकांकडे बाप्पाच्या दर्शनाला जातात. त्यानिमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येतात.
मध्यप्रदेशच्या उज्जैनमध्येही सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आहे. येथे विराजमान अष्टविनायकांची स्थापना स्वतः भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेने केली होती, अशी मान्यता आहे. अर्थातच या मंदिरांमध्ये गणेशोत्सव काळातच नाही, तर वर्षाचे बाराही महिने भाविकांची मांदियाळी असते. शहरात असलेल्या श्री अविघ्न विनायक गणेश मंदिरात दर्शन घेण्यासाठी तर भाविक मोठ्याप्रमाणात गर्दी करतात. त्यामागे कारणही तसंच आहे.
advertisement
40 वर्ग फूट क्षेत्रात वसलेल्या या मंदिरात बाप्पाची जवळपास साडेतीन फूट उंच मूर्ती विराजमान आहे. असं म्हणतात की, 'या बाप्पाचं दर्शन केल्यास कोणत्याही शुभ, मंगल कार्यात येणारी कोणतीही बाधा मुळासकट नष्ट होते. अविघ्न विनायक गणेश मंदिर हे अष्टविनायकांमध्ये पाचव्या स्थानी आहे. सीता मातेने गणेश चतुर्थीच्या वेळी आपलं व्रत याठिकाणीच सोडलं होतं आणि अविघ्न विनायकाची स्थापना केली होती.'
advertisement
श्री अविघ्न विनायक गणेश मंदिर
श्री अविघ्न विनायक गणेश मंदिर
दरम्यान, शहरात ठिकठिकाणी गणेशोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशात उज्जैनच्या अविघ्न विनायक गणेश मंदिरात दररोज भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. त्यातही विशेष बाब म्हणजे, इथे येणाऱ्या भाविकांमध्ये तरुणांची संख्या अधिक असते. त्यामागचं कारण असं की, वय निघून चाललंय मात्र लग्न जुळत नाहीये, लग्न जुळण्यात अडचणी येत आहेत अशा व्यक्तींनी या मंदिरात बाप्पाला हळदीची गाठ अर्पण करावी, अशी मान्यता आहे. तसंच यामुळे लग्नासंबंधातील सर्व विघ्न दूर होतात आणि एक अनुरूप जोडीदार मिळतो, असं म्हटलं जातं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
लग्न जुळत नाहीये? केवळ 'इतकं'च करा, मिळेल अनुरूप जोडीदार, लाभेल सुखाची साथ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement