स्वप्नात स्वत:चे किंवा मित्र-मैत्रिणीचे लग्न झालेले पाहणे शुभ कि अशुभ? जाणून घ्या, यामागचे महत्त्वाचे संकेत
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अविवाहित तरुण आणि तरुणी लवकर लग्न व्हावे यासाठी पूजा-उपवास करतात. यासाठी त्यांच्या मनात लग्न लवकर व्हावे, याचा विचार नेहमी राहतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपतही त्यांना लग्नाचे स्वप्न पडते.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : हिंदू धर्मात विवाहला एक पवित्र कार्य मानले गेले आहे. भारतात विवाह दरम्यान, एक सणासारखे वातावरण असते. सध्या मे आणि पुढच्या महिन्यात लग्नाचा कोणताही मुहूर्त नाही. ज्योतिष गणनेनुसार, गुरू 7 मे ते 6 जून 2024 पर्यंत 30 दिवसांसाठी अस्त राहील. तर शुक्र 27 एप्रिल ते 28 जून पर्यंत 63 दिवस अस्त राहील.
advertisement
ज्योतिष शास्त्रानुसार, विवाह मुहूर्तमध्ये गुरू आणि शुक्र अस्तचासुद्धा विचार केला जातो. दोन्ही ग्रह अस्त झाल्याने त्या कालावधीत लग्नकार्य होत नाही. यानंतर जुलै महिन्यात विवाह मुहूर्त मिळतील.
17 जुलै रोजी हरिशयनी एकादशीपासून चातुर्मास प्रारंभ होणार आहो. यानंतर मग मांगलिक कार्य थांबतील. या कालावधीत मंगलकार्य पार पडत नाही. मात्र, लग्न जुळवून ठेऊ शकतात. अविवाहित तरुण आणि तरुणी लवकर लग्न व्हावे यासाठी पूजा-उपवास करतात. यासाठी त्यांच्या मनात लग्न लवकर व्हावे, याचा विचार नेहमी राहतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपतही त्यांना लग्नाचे स्वप्न पडते. स्वप्नांचे आपल्या वास्तविक आयुष्यासोबत विशेष नाते असते. जर तुम्हीही झोपेत स्वत:चे लग्न होताना पाहिले असेल तर याचा नेमका अर्थ काय होतो, हे जाणून घेऊयात.
advertisement
स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात स्वत:चे लग्न होताना पाहणे, हे खूप चांगले स्वप्न मानले जात नाही. हे स्वप्न तुमच्या आयुष्यात विविध प्रकारची आव्हानं घेऊन येतं. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात, त्याठिकाणी तुमच्या मान-सन्मानात कमी येऊ शकते. तसेच तुम्ही विवाहित असाल आणि तुम्हाला तुमच्या दुसऱ्या लग्नाचे स्वप्न पडत असेल तर वैवाहिक जीवनात तुम्हाला संकटांचा सामना करावा लागू शकतो, हे दिसून येते.
advertisement
online profile पाहून पार्टनर ठरवत आहात, तर आधी या गोष्टी वाचा, नाहीतर आयुष्यभर रडत बसाल..
⦁ स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात मित्राचे लग्न पाहणेही योग्य शुभ नसते. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, येणाऱ्या काळात तुमच्या कार्यात बाधा येऊ शकते. तुम्ही मानसिक रुपाने तणावात येऊ शकतात.
⦁ जर तुम्ही स्वप्नात तुमची स्वत:ची वरात जाताना पाहात असाल तर स्वप्न शास्त्रात हे शुभ मानले गेले आहे. याचा अर्थ असा की, लवकरच तुमचे भविष्य स्वर्णिम होणार आहे. तुमच्या मान सन्मानात वाढ होणार आहे. तसेच मोठ्या, प्रसिद्ध लोकांशी तुमची ओळख होणार आहे.
advertisement
⦁ स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही तुमच्या नातेवाईकाचे लग्न होताना पाहत असाल तर हे स्वप्न तुमचे आत्मविश्वास वाढवणारे आहे. हे स्वप्न पाहिल्यावर तुम्ही भविष्यासाठी योग्य योजना तयार करू शकतात.
⦁ जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला लग्नाच्या ड्रेसमध्ये पाहत असाल तर हे स्वप्न शुभ मानले गेले आहे. या स्वप्नाचा अर्थ लावला जाऊ शकतो की, दाम्पत्य जीवनात तुम्हाला किती प्रकारचा आनंद मिळेल.
advertisement
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
May 22, 2024 7:46 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
स्वप्नात स्वत:चे किंवा मित्र-मैत्रिणीचे लग्न झालेले पाहणे शुभ कि अशुभ? जाणून घ्या, यामागचे महत्त्वाचे संकेत