महाराष्ट्रात इथं खेळली जाते रक्ताची धुळवड, दगडाने फोडतात एकमेकांची डोकी, अशी कशी परंपरा?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
गावातील लोकांनी दोन गट करत एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यात जखमी झालेल्यांना गावातील जगदंबा देवी मंदिरात भंडारा लावला जातो.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात धुलीवंदन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. एकीकडे संपूर्ण देशात एकमेकांना रंग लावून हा सण साजरा होत असताना, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या भोयरे गावात मात्र एकमेकांना दगड मारत धुलीवंदन म्हणजेच रक्ताची धुळवड साजरी करण्यात आली. या संदर्भात अधिक माहिती भोयरे गावाचे माजी सरपंच बालाजी साठे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भोयरे येथे चक्क रक्ताची धुळवड साजरी केली करण्यात आली. गावातील लोकांनी दोन गट करत एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यात जखमी झालेल्यांना गावातील जगदंबा देवी मंदिरात भंडारा लावला जातो. जेवढे जास्त लोक जखमी होतील तेवढा पाऊस चांगला पडतो, अशी गावातील लोकांची धारणा आहे.
advertisement
भोयरे येथील जगदंबा मंदिर उंचावर आहे. या मंदिरात गावकऱ्यांचा एक गट थांबतो. तर पायथ्याला असणाऱ्या गावातील मुख्य चौकात दुसरा गट उभा राहतो. खाली उभा राहिलेल्या गटातील लोक उंचावर असणाऱ्या मंदिरातील गटावर दगड-गोटे भिरकावतो. तर वरून चौकात थांबलेल्या लोकांवर दगड-गोटे भिरकावले जातात.
advertisement
खाली थांबलेले लोक अंगावर येणारे दगड चुकवतात. परंतु, या दगडफेकीत काहींना दगड लागतात आणि रक्तही येते. तेव्हा जखमी व्यक्तीला मंदिरात नेत जखमेवर देवीचा भंडारा लावला जातो. त्यामुळे जखम बरी होते, अशी गावकऱ्यांची धारणा आहे. मोहोळ तालुक्यातील भोयरे येथील रक्ताची धुळवड पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोक जमले होते.
advertisement
view comments
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
March 14, 2025 6:42 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
महाराष्ट्रात इथं खेळली जाते रक्ताची धुळवड, दगडाने फोडतात एकमेकांची डोकी, अशी कशी परंपरा?

