पूजेव्यतिरिक्त पितृपक्षात घरबसल्या आवर्जुन करा हे काम, पितरांना मिळेल मुक्ती!

Last Updated:

पितृपक्षात काही झाडांची लागवड करणं खूप शुभ मानलं जातं. त्याविषयी जाणून घेऊ या.

पितृपक्षाचे महत्त्व 2023
पितृपक्षाचे महत्त्व 2023
मुंबई, 25 सप्टेंबर : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांतीसाठी व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. पितृपक्ष दर वर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि तो भाद्रपद अमावास्येपर्यंत असतो. पितृपक्षात काही झाडांची लागवड करणं खूप शुभ मानलं जातं. त्याविषयी जाणून घेऊ या.
यंदा पितृपक्ष 29 सप्टेंबर 2023 पासून सुरू होत असून 14 ऑक्टोबर 2023 म्हणजेच सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी संपणार आहे. वनस्पतींमध्येही प्राण असतो व त्यांना सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा जाणवत असते, असं मानलं जातं. तसंच पूर्वज हे वनस्पतींमध्येही असतात. त्यामुळेच पितृपक्षात काही झाडं लावली किंवा त्यांची पूजा केली, तर पूर्वजदेखील प्रसन्न होतात व त्यांचा आशीर्वाद मिळतो, अशी धार्मिक मान्यता आहे. ज्योतिषी शैलेंद्र पांडे यांच्या मते पितृपक्षात नेमकी कोणती झाडे लावली पाहिजेत, हे जाणून घेऊ.
advertisement
तुळस
तुळशीचं एक पान हे वैकुंठापर्यंत पोहोचवू शकते, अशी धार्मिक मान्यता आहे. अंत्यसंस्कारानंतर त्या जागी तुळशीचं रोप लावण्यात येतं. पितृपक्षात तुळशीचं रोप लावून त्याची काळजी घेतली, तर पितरांना निश्चितच मुक्ती मिळते. पितृपक्षात तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घातल्यास पितरांना समाधान मिळतं. घरात तुळशीचं रोप लावून ते वाढवलं, तर घरात अकाली मृत्यू होण्याची शक्यता नसते.
advertisement
बेल
पितृपक्षात बेलाचं झाड लावलं तर अतृप्त आत्म्याला शांती मिळते. अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाला बेलपत्र आणि गंगाजल अर्पण केल्याने सर्व पितरांना मुक्ती मिळते, अशीही मान्यता आहे.
अशोक
जिथे अशोकाचं झाड आहे तिथे शोक अर्थात दुःख नसतं, असं म्हटलं जातं. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अशोकाचं झाड लावल्यानं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही.
advertisement
पिंपळ
हिंदू धर्मात पिंपळ हा सर्वांत पवित्र वृक्ष मानला जातो. पितृपक्षात पिंपळ लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. पितृपक्षात पिंपळाच्या झाडाखाली नियमित दिवा लावणं, तसंच पिंपळाला पाणी घातल्याने पूर्वज प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे.
वटवृक्ष
वटवृक्ष हा जीवन व मोक्ष देणारा वृक्ष मानला जातो. पितरांची मुक्ती झाली नाही, असं वाटत असेल, तर वडाच्या झाडाखाली बसून भगवान शिवाची पूजा करा. तसंच वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला.
advertisement
पितृपक्षात तिथीनुसार पितरांचं श्राद्ध केलं जातं. त्यामुळे पूर्वजांना मुक्ती मिळण्यास मदत होते.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
पूजेव्यतिरिक्त पितृपक्षात घरबसल्या आवर्जुन करा हे काम, पितरांना मिळेल मुक्ती!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement