संत गजानन महाराजांची पालखी जालन्यात, 36 वर्षांपासून या दाम्पत्याची अनोखी सेवा, Video
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Sant Gajanan Maharaj: संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी वारीनंतर परतीच्या मार्गावर आहे. जालन्यात गेल्या 36 वर्षांपासून एक दाम्पत्याने सेवेची परंपरा जपली आहे.
जालना: शेकडो वर्षांची परंपरा असलेली संत गजानन महाराजांच्या पालखीचं जालना शहरामध्ये आगमन झालं आहे. आज सकाळी (21 जुलै) आठ वाजता पालखी गोलापांगरी शिवारातील टोल नाका येथे पोहोचली. तब्बल 700 वारकरी असलेली ही पालखी शिस्त आणि स्वच्छतेसाठी ओळखली जाते. आषाढी एकादशीनंतर पंढरपूरवरून ही पालखी शेगावकडे रवाना होत आहे.
दरवर्षी या पालखीतील सातशे वारकऱ्यांबरोबरच आसपासच्या परिसरातील दीड ते 2 हजार भाविकांसाठी मागील 36 वर्षांपासून दीपक कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंब भोजनाची व्यवस्था करत आहे. दरवर्षी वरण-भात, भाज- पोळी अशा पद्धतीचा भोजनाचा मेनू असतो. परंतु, यावर्षी एकादशी असल्याने भाविकांसाठी बटाट्याचा शिरा आणि साबुदाण्याची खिचडी व दह्याची आमटी अशी सोय करण्यात आली.
advertisement
जालना शहरामध्ये या पालखीचा दोन दिवस मुक्काम असणार आहे. आज ही पालखी जुना जालना शहरातील काळुंका माता मंदिर येथे मुक्कामी राहणार आहे. तर मंगळवारी शहरभर फिरून जे. एस. महाविद्यालय जालनाच्या मैदानामध्ये मुक्काम करणार आहे. तर 23 जुलै रोजी सकाळी बुलढाणा जिल्ह्याकडे प्रस्थान करणार आहे.
advertisement
संत गजानन महाराजांची महती अनन्यसाधारण आहे. तिथे शेगावला भाविकांसाठी असंख्य सोयी सुविधा पुरवल्या जातात. गजानन महाराजांची आणि विठ्ठलाचे आमची कुटुंब मागील अनेक वर्षांपासून सेवेकरी राहिले आहे. हा दिंडी सोहळा वारकऱ्यांना चांगली मूल्य नीती आणि संस्कार शिकवतो अनेकांना यामध्ये सामावून घेतो. हा दिव्य सोहळ्या पाहण्यासाठी आसपासच्या परिसरातील लोक देखील येतात आणि सन मार्गाला लागतात. आमच्यासाठी हा सोहळा दिवाळीपेक्षाही मोठा आहे. भाविकांच्या सेवेतून मनाला आत्मिक आनंद मिळत असल्याचे दीपक कुलकर्णी यांनी लोकल एटीनशी बोलताना सांगितलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jul 21, 2025 10:16 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
संत गजानन महाराजांची पालखी जालन्यात, 36 वर्षांपासून या दाम्पत्याची अनोखी सेवा, Video







