Shravan 2025: श्रावणाचा दुसरा सोमवार, शिवलिंगावर तीळ अर्पण करण्याचे महत्त्व, कर्जमुक्तीपासून समृद्धीपर्यंत...

Last Updated:

Shravan Somwar: श्रावण महिन्यात शिवलिंगावर शिवमूठ अर्पण करण्याची परंपरा आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवारला तीळ अर्पण करण्याचे महत्त्व आहे.

+
Shravan

Shravan 2025: श्रावणाचा दुसरा सोमवार, शिवलिंगावर तीळ अर्पण करण्याचे महत्त्व, कर्जमुक्तीपासून समृद्धीपर्यंत...

मुंबई: श्रावण महिना सुरू झाल्यापासून भक्तिभावाने वातावरण भारलेलं आहे. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात दर सोमवारी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. 'श्रावणी सोमवार' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दिवसांना शिवभक्त विशेष महत्त्व देतात. या दिवशी भगवान शिवाला 'शिवा मूठ' अर्पण करण्याची परंपरा आहे. पहिल्या सोमवारी तांदळाची शिवा मूठ अर्पण केली जाते, तर दुसऱ्या सोमवारी तीळ अर्पण करायचे असतात.
4 ऑगस्ट रोजी दुसरा श्रावणी सोमवार असून, यावेळी भगवान शिवाच्या पिंडीवर तीळ अर्पण करण्याची परंपरा आहे. याला 'तीळकार' म्हणतात. यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि कृषी संस्कृतीशी संबंधित अनेक अर्थ दडलेले आहेत. श्रावण सोमवारी शिवामूठ अर्पण करण्याचे महत्त्व आणि त्याचबरोबर तिळाचे महत्त्व काय आहे, याबद्दल आदित्य जोशी गुरुजींनी माहिती दिली आहे.
श्रावण महिन्यात शेतातील पिके शिजू लागतात, परिपक्व होतात, आणि त्यांचा उपयोग सुरू होतो. त्यामागील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ज्या अन्नधान्याचा उपभोग घेतो, त्यातील थोडा भाग प्रभू चरणी अर्पण करतो. हीच भावना 'शिवा मूठ' या परंपरेतून व्यक्त होते.
advertisement
तीळ हे आरोग्यदायी आणि पवित्र मानले जाणारे धान्य आहे. त्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर तीळ अर्पण करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक ग्रंथांनुसार, तीळ अर्पण केल्याने घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते, सुख-समृद्धी नांदते आणि कर्ज कमी होण्यास मदत होते. तसेच, तीळ अर्पण केल्यामुळे ग्रहदोष, विशेषतः शनीसंबंधी त्रास शांत होतो, असे मानले जाते.
advertisement
तिळाचे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व देखील मोठे आहे. तीळात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्याची क्षमता असते. म्हणूनच श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवाला तीळ अर्पण केल्यास मनःशांती लाभते आणि आर्थिक अडचणी दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
तीळ अर्पण करताना ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा, अशी धार्मिक परंपरा आहे. मंत्रजपामुळे अर्पण केलेले तीळ अधिक प्रभावी ठरतात आणि त्याचा आध्यात्मिक लाभही अधिक मिळतो. यामुळे केवळ बाह्य पूजनच नव्हे, तर अंतःकरणातील भक्तीही व्यक्त होते.
advertisement
यंदा दुसरा श्रावणी सोमवार 4 ऑगस्ट रोजी असून, या दिवशी शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळेल. त्या दिवशी भगवान शंकरावर तीळ अर्पण करून, ‘तीळकार’ केल्यास आपल्यावरील संकटे दूर होऊन सुख, समृद्धी आणि कर्जमुक्त जीवनाकडे वाटचाल होते.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shravan 2025: श्रावणाचा दुसरा सोमवार, शिवलिंगावर तीळ अर्पण करण्याचे महत्त्व, कर्जमुक्तीपासून समृद्धीपर्यंत...
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement