गुढीपाडव्याला सूर्यग्रहणाचं संकट? पंचागकर्ते दाते यांनी स्पष्टच सांगितलं शास्त्र, Video
- Published by:Aaditi Datar
Last Updated:
गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. पण यंदा गुढीपाडव्यावर सूर्यग्रहणाचे संकट असल्याचा दावा काहींनी केला आहे.
प्रसाद दिवाणजी, प्रतिनिधी
सोलापूर: हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषत: महाराष्ट्रात गुढीपाडवा सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. गुढी म्हणजे विजय पताका मानली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. पण यंदा गुढीपाडव्यावर सूर्यग्रहणाचे संकट असल्याचा दावा काहींनी केला आहे. याबाबत सोलापुरातील प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी माहिती दिलीय.
advertisement
पाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण
गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी अर्थात सोमवारी (दि. 8) सूर्यग्रहण आहे. मात्र ते भारतात दिसणार नसल्याने त्याचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. तसेच पाडव्याच्या दिवशी वैधृत योग असला तरीही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा दिवस शुभच आहे. नवीन उद्योग, व्यवसायाचा शुभारंभ करण्यासाठी मंगळवार (दि. 9) चा गुढीपाडव्याचा दिवस उत्तम मुहूर्त आहे. त्यामुळे घरोघरी गुढी उभारून, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे.
advertisement
सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही
यंदा चैत्र शुद्ध प्रतिपदा शके 1946 नववर्ष आरंभ 9 एप्रिल रोजी होत आहे. क्रोधीनाम संवत्सर असे त्याचे नाव आहे. याच्या आधी म्हणजेच 8 एप्रिल रोजी एक सूर्यग्रहण आहे. परंतु ते भारतात दिसणार नसल्याने त्याचे कोणतेही नियम भारतातील हिंदू बांधवांनी पाळू नयेत. त्यामुळे ग्रहणाचा करिदिन सुद्धा 9 एप्रिल नाहिये. तर 9 एप्रिलला वैतृती योग आहे. परंतु साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस गुढीपाडवा असल्याने वैतृती योगाचा विचार करण्याचे कारण नाहीये. साडेतीन मुहूर्तांचा शुभ दिवस हिंदू बांधवांनी आनंदात साजरा करायचा आहे. समजा आपल्याला काही दुकानाचे उद्घाटन, नवीन कामांचा शुभारंभ आदी गोष्टी आपण आवश्यक करू शकता, असेही दाते यांनी सांगितले.
Location :
First Published :
April 08, 2024 10:52 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
गुढीपाडव्याला सूर्यग्रहणाचं संकट? पंचागकर्ते दाते यांनी स्पष्टच सांगितलं शास्त्र, Video