गुढीपाडव्याला सोनं खरेदी करण्याआधी हा Video नक्की पाहा, फायद्यात राहाल!

Last Updated:

सध्या सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडले आहेत, तरीही शुभमुहूर्तावर खरेदी करायला हवी म्हणून काहीजण ओढाताण करून अर्धा ग्रॅम का होईना पण सोनं खरेदी करतात.

+
सोनं

सोनं खरेदी ही आपल्यासाठी एक महत्त्वाची गुंतवणूक ठरते.

शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकजण सोनं खरेदी करतात. ही प्रथा फार पूर्वीपासून चालत आलीये. कारण गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोनंखरेदी केल्यास आपली प्रचंड भरभराट होते अशी मान्यता आहे.
सध्या सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडले आहेत, तरीही शुभमुहूर्तावर खरेदी करायला हवी म्हणून काहीजण ओढाताण करून अर्धा ग्रॅम का होईना पण सोनं खरेदी करतात. परंतु फक्त प्रथा म्हणून सोनं खरेदी करणं योग्य आहे का? दागिने खरेदी म्हणजे गुंतवणूक की खर्च? याबाबत पुण्यातील प्रसिद्ध सोनार वृषभ राका यांनी माहिती दिली आहे.
advertisement
राका यांनी सांगितलं की, सोनं खरेदी ही आपल्यासाठी एक महत्त्वाची गुंतवणूक ठरते. सोनं तारण ठेवणं, त्यावर कर्ज घेणं हे आजच्या काळात तुलनेनं सोपं आहे. दागिन्यांमुळे गरज असेल तेव्हा पैसे उभे करता येतात. म्हणून मालमत्तेच्या तुलनेत लोक आजही सोन्याकडे एक उत्तम गुंतवणूक म्हणून पाहतात.
advertisement
सोन्याच्या किंमती थोड्या का होईना पण सतत कमी-जास्त होत असतात. बाकी चलनाच्या किंमतीत चढ-उतार झाला की, सोन्याच्या किंमतीतही बदल होतात. परंतु महागाई आणि सोनं हे गणित तुम्हाला कधीही फायद्याचंच ठरू शकतं, हे लक्षात असूद्या. त्यामुळे पाडव्याला सोनं खरेदीचा विचार करत असाल तर वाढलेले भाव लक्षात घेऊन भविष्यात ही गुंतवणूक तुम्हाला फायद्याचीच ठरेल यात काही शंका नाही, असं मत राका यांनी मांडलं.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/Viral/
गुढीपाडव्याला सोनं खरेदी करण्याआधी हा Video नक्की पाहा, फायद्यात राहाल!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement