गुढीपाडव्याला सोनं मुहूर्तावर खरेदी करा, तरच होईल भरभराट! 'ही' वेळ चूकवू नका
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
इंग्रजी नववर्ष जसं 1 जानेवारीला धुमधडाक्यात सुरू होतं. तसंच गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारून मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवसाला ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या सोनं खरेदीमुळे आपली भरभराट होते अशी मान्यता आहे. परंतु ही भरभराट तेव्हाच होते जेव्हा आपण सोनं योग्य मुहूर्तावर खरेदी करतो. 9 एप्रिलला सर्वत्र गुढीपाडवा उत्साहात साजरा होईल. तुम्ही जर या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल, तर आधी शुभ मुहूर्त जाणून घ्या. गुरूजी उमेश कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली आहे. (अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी / छत्रपती संभाजीनगर)
गुढीपाडव्याच्या दिवशी स्वच्छ आंघोळ केल्यानंतर सणावाराचे कपडे परिधान करून गुढी उभारावी. गुढी उभारण्यासाठी सकाळी 6 वाजून 27 मिनिटांपासून 9 वाजून 32 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे. गुढीला नवे सुरेख वस्त्र नेसवावे, मग तिची विधीवत पूजा करावी. तिला साखरेची गाठी घालावी. पूजेनंतर गुढीसमोर नैवेद्य ठेवा. तसंच लिंबाची पानं, मिरे, हिंग आणि ओवा एकत्र करून त्याचा नैवेद्यही गुढीला दाखवा. विशेष म्हणजे हा नैवेद्य सर्वांनी खायला हवा. कारण तो आरोग्यदायी असतो. त्यामुळे विविध आजारांवर आराम मिळतो. वर्ष सुदृढ जातं. म्हणूनच गुढीला हा नैवेद्य दाखवून घरातील सर्व व्यक्तींनी खाण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे.
advertisement
advertisement
मुख्य म्हणजे सोनं खरेदीसाठी केवळ एकच मुहूर्त नाहीये. तर, यंदाच्या गुढीपाडव्याला तुम्ही दुपारी आणि रात्रीसुद्धा सोन्याचे दागिने खरेदी करू शकता. त्यासाठी मुहूर्त आहे दुपारी 2 वाजून 33 मिनिटांपासून 4 वाजून 42 मिनिटांपर्यंत. तर, रात्री 9 वाजून 3 मिनिटांपासून 11 वाजून 12 मिनिटांपर्यंत तुम्ही सोनं खरेदी करू शकता.
advertisement
advertisement