Gudi Padwa 2025: गुढीपाडवा का साजरा करतात? ही तीन कारणे तुम्हाला माहिती असायलाच हवी, Video
- Reported by:Kale Narayan
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
हिंदू धर्मात गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो? याबाबत जालना येथील डॉ. राजेश महाराज सामनगावकर यांनी माहिती दिलीय.
जालना: मराठी नववर्षातील पहिला सण म्हणजेच गुढीपाडवा होय. घरोघरी गुढी उभारून नवचैतन्याचा हा सण प्रत्येक मराठी कुटुंब मोठ्या उत्साहाने साजरा करत असते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून देखील गुढीपाडव्याला महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी अनेक शुभ कार्य करण्याची परंपरा आहे. त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी देखील या दिवशी होत असते. अतिशय महत्त्वाचा सण असला तरी गुढीपाडव्याच्या धार्मिक महत्त्वाविषयी अनेकांना माहिती नसते. हिंदू धर्मात गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो? याबाबत जालना येथील डॉ. राजेश महाराज सामनगावकर यांनी माहिती दिलीय.
श्रीरामाशी कनेक्शन
गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागील पहिले कारण प्रभू रामचंद्र हे आहेत. श्री रामचंद्रांचे लंकेवर विजय मिळवून अयोध्येमध्ये आगमन केले. तो दिवस चैत्रशुद्ध प्रतिपदा होता. त्यामुळेच अयोध्येतील प्रजेने घरोघरी गुढी उभारून आनंद साजरा केला. तेव्हापासून गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहे.
advertisement
इंद्राशी संबंधित आख्यायिका
गुढीपाडव्याबाबत दुसरी एक आख्यायिका सांगितली जाते. उपचार नावाचा एक राजा होता. त्याला इंद्राने कलकी म्हणजेच एक काठी दिली. राजदरबारात आल्यानंतर या राजाने त्या काठीवर रेशमी वस्त्र, आंब्याचा लिंबाचा पाला तसेच गाठी लावून इंद्राचं राजदरबारात स्वागत केलं. यामुळे या राजाचा विजय झाला. तेव्हापासून विजयाचे प्रतीक म्हणून प्रत्येक राजा चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुढी उभारून गुढीपाडवा हा सण साजरा करू लागला. तेव्हापासून गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा सुरू झाली, असे सामनगावकर सांगतात.
advertisement
शालिवहन राजाचा विजय
तिसरं कारण म्हणजे शक नावाच्या राजाने पृथ्वीवर खूप उत्पात माजवला होता. तेव्हा कुंभाराचा मुलगा शालिवाहन याने 6500 मातीचे पुतळे तयार केले आणि त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून प्राण ओतला. शकासोबत झालेल्या युद्धामध्ये शालिवाहन राजाचा विजय झाला. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा होता. यामुळेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला दरवर्षी गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा सुरू झाल्याचे डॉक्टर राजेश महाराज सामनगावकर यांनी सांगितलं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Apr 08, 2024 6:20 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Gudi Padwa 2025: गुढीपाडवा का साजरा करतात? ही तीन कारणे तुम्हाला माहिती असायलाच हवी, Video









