advertisement

मुंबई- पुण्यात 25 दिवसांनतर तर ग्रामीण भागात किती दिवसांनी मिळणार सिलेंडर? नवी नियमावली जाहीर

Last Updated:

देशातील काळाबाजार रोखण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

News18
News18
मुंबई : अमेरिका इराण युद्ध जसजसं लाबंत चाललंय तसतसं युद्ध आपल्या अगदी जवळ येवू लागलंय. त्याच्या झळांनी सामान्य माणसाची होरपळ सुरु झालीय. काही अफवांनी त्यात भर घातलीय हे खरं आहे पण रोजच्या चुलीचा प्रश्न सगळ्यांना चिंतेत टाकतोय म्हणून गॅस मिळवण्यासाठी रांगा लागल्या आहेत. त्यामुळे या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काळाबाजार सुरू झालाय. दोन हजारांना मिळणारा कमर्शियल सिलेंडर आता थेट चार हजार रुपयांपर्यंत पोहोचलाय. हा काळाबाजार रोखण्यासाठी यंत्रणा कामाला लागली असून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
इराण आणि अमेरिका इस्रायलचं युद्ध सुरु होऊन 13 दिवस उलटले आहेत. या युद्धाची झळ राज्यातील ग्रामीण भागालाही बसू लागली आहे. .राज्यातील अनेक शहरात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा असून ग्राहक पहाटेपासूनच गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर रांगा लावताना दिसून येत आहेत. देशभर निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर गॅस वितरणाबाबत नवा नियम लागू करण्यात आला आहे. शहरी भागात गॅस सिलेंडर वितरणाचा कालावधी 25 दिवसांचा ठेवण्यात आला आहे.
advertisement

काय आहे नवा नियम?

युद्ध सुरु झाल्यानंतर घरगुती सिलिंडर बुकिंगसाठीचा 21 दिवसांचा नियम बदलून 25 दिवसांवर करण्यात आला आहे. तर ग्रामीण व दुर्गम भागासाठी हा कालावधी 45 दिवसांचा करण्यात आला असुन हा कालावधी ऑनलाईन गँस बुकिंगवेळी लागू होत आहे वाढत्या मागणीमुळे आणि पुरवठ्यावर आलेल्या ताणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हातातली कामं सोडून.....ऑफिस बुडवून.....लेकराबाळांना घरी सोडून लोक सिलिंडर घेण्यासाठी 8 -8 तास रांगा लावत असल्याचे चित्र दिसत आहे. अशावेळी जर गॅस मिळाला नाही तर वितरक आणि ग्राहकांमध्ये हमरीतुमरीची पाळी येते म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement

राज्यात ग्राहकांची धावपळ उडाल्याचं चित्र

एकीकडे एलपीजी सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहक लांबच्या लांब रांगा लावत असताना वितरक मात्र गॅसचा मुबलक पुरवठा आहे.. लोकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन करताना दिसत आहेत. एकीकडे गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी राज्यात ग्राहकांची धावपळ उडाल्याचं चित्र आहे. युद्धामुळे परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीला ब्रेक लावलं आहे. त्यामुळे घरगुती गॅस ग्राहकांची चिंता वाढली आहे.
advertisement

40 दिवस पुरेल इतका एलपीजीचा बफर स्टॉक उपलब्ध

आज भारताकडे 40 दिवस पुरेल इतका एलपीजीचा बफर स्टॉक उपलब्ध आहे. तसंच, भारत आता केवळ मध्य पूर्वेवर अवलंबून न राहता अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाकडून अधिक आयात करण्याच्या तयारीत आहे. केवळ साठेबाजी रोखण्यासाठी एलपीजीच्या बुकिंगचा कालावधी 4 दिवसांनी वाढवण्यात आला असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन सरकारकडून करण्यात येतेय
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबई- पुण्यात 25 दिवसांनतर तर ग्रामीण भागात किती दिवसांनी मिळणार सिलेंडर? नवी नियमावली जाहीर
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement