advertisement

कधी आहे सोमवती अमावस्या? आत्ताच नोट करा अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त

Last Updated:

हिंदू धर्मात अमावस्ये तिथीला अत्यंत महत्त्व दिले जाते, परंतु जेव्हा ही अमावस्या सोमवारी येते, तेव्हा तिला 'सोमवती अमावस्या' म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात आणि धर्मशास्त्रात सोमवती अमावस्येला 'पर्वणी' मानले जाते.

News18
News18
Somvati Amavasya 2026 : हिंदू धर्मात अमावस्ये तिथीला अत्यंत महत्त्व दिले जाते, परंतु जेव्हा ही अमावस्या सोमवारी येते, तेव्हा तिला 'सोमवती अमावस्या' म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात आणि धर्मशास्त्रात सोमवती अमावस्येला 'पर्वणी' मानले जाते. या दिवशी गंगास्नान, दान आणि पितृ तर्पणाला विशेष महत्त्व असते. वर्ष 2026 मध्ये फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीनंतर लगेचच सोमवती अमावस्येचा अत्यंत शुभ योग जुळून येत आहे.
सोमवती अमावस्या 2026: तारीख आणि वेळ
यंदा महाशिवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 फेब्रुवारी 2026, सोमवार रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाईल. 15 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री उशिरा 2:15 वाजता या अमावस्येचा प्रारंभ होईल. तर 16 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11:45 वाजता ही अमावस्या संपेल. उदया तिथीनुसार सोमवती अमावस्या सोमवारी, 16 फेब्रुवारी रोजीच साजरी केली जाईल.
advertisement
सोमवती अमावस्येचे धार्मिक महत्त्व
सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे आणि अमावस्या ही पितरांची तिथी आहे. या दिवशी शिव आणि शक्तीची एकत्र पूजा केल्याने कुंडलीतील चंद्र दोष दूर होतो. तसेच, ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे, त्यांच्यासाठी हा दिवस श्राद्ध आणि तर्पणासाठी सर्वोत्तम मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी विवाहित महिलांनी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते.
advertisement
पूजा विधी
सकाळी सूर्योदयापूर्वी उठून एखाद्या पवित्र नदीत स्नान करावे. जर ते शक्य नसेल, तर घरातील अंघोळीच्या पाण्यात गंगेचे पाणी टाकून स्नान करावे. स्नानानंतर तांब्याच्या कलशातून सूर्याला जल अर्पण करावे. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला दूध आणि जल अर्पण करावे. झाडाला सात वेळा सूती धागा गुंडाळून परिक्रमा करावी. दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांच्या नावाने तीळ आणि जल अर्पण करावे. यामुळे पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. पूजेनंतर गरजू व्यक्तींना अन्न, काळे तीळ, कपडे किंवा धान्याचे दान करावे.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
कधी आहे सोमवती अमावस्या? आत्ताच नोट करा अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement