नोव्हेंबर महिन्यात 'या' राशींवर राहणार सूर्यदेवाची कृपा, पाहा तुमची तर नाही?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
सध्या सूर्य तूळ राशीत आहे. आता 17 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 1 वाजून 7 मिनिटांनी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
मुंबई : ग्रह एका विशिष्ट वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ज्योतिषशास्त्रानुसार या बदलांचा परिणाम प्रत्येक राशीवर कमीअधिक प्रमाणात होत असतो. येत्या काही दिवसांत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने खूपच महत्त्वाचा मानला जाणारा सूर्य ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या बदलांमुळे चार राशीवर सूर्यदेवांची कृपा राहणार आहे.
ज्योतिषशास्त्रात सूर्याला पितृकारक मानलं जातं. कुंडलीत सूर्य बलवान असेल, तर करिअर आणि व्यवसायात इच्छित यश प्राप्त होतं. पण जर कुंडलीत सूर्य कमकुवत असेल, तर अशा व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. पंडित हर्षित शर्मा यांनी सांगितलं की, सूर्य ग्रह दर 30 दिवसांनी राशी बदलतो.
सध्या सूर्य तूळ राशीत आहे. आता 17 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 1 वाजून 7 मिनिटांनी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. तर, बुध ग्रहसुद्धा 6 नोव्हेंबर 2023 ला वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. वृश्चिक राशीत या दोन ग्रहांची उपस्थिती काही राशींना खूप फायदेशीर ठरणार आहे. त्या राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ.
advertisement
मेष
सूर्य व बुध यांची वृश्चिक राशीतील युती ही मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. नोकरीत बढती मिळण्याची आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. विरोधक पराभूत होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. जीवनात आनंद येईल.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचं संक्रमण खूप शुभ परिणाम देणारं आहे. नोकरदारांना नवीन संधी मिळतील. व्यक्तिमत्व प्रभावी होईल. धैर्य आणि शौर्य वाढेल. सर्वांशी चांगलं वागणं फायद्याचं ठरेल. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असणारी कामं पूर्ण होतील. उत्पन्न वाढेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल.
advertisement
कन्या
कन्या राशीतील व्यक्तींसाठी सूर्य ग्रहाचं संक्रमण चांगल्या दिवसांची सुरुवात करणार आहे. या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रेम आणि पैसा वाढेल. काही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक लाभ होईल. जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ
सूर्याच्या राशीतील बदलामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होणार आहे. ऑफिसमध्ये मोठं यश मिळू शकते. तुमच्या खास मित्राकडून तुम्हाला काही मोठा फायदा होऊ शकतो. विरोधक पराभूत होतील. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. वडिलांचे सहकार्य मिळेल. या काळात रखडलेली सरकारी कामे सहज पूर्ण होतील.
advertisement
दरम्यान, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होत असतो. अर्थात त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2023 1:31 AM IST