दिवाळीत अक्कलकोट, गाणगापूरला जाताय? मंदिरांच्या दर्शन वेळा बदलल्या, भाविकांसाठी महत्त्वाची बातमी!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Akkalkot Temple: अक्कलकोट स्वामी समर्थ भक्तांसाठी दिवाळीत आनंदाची बातमी आहे. वटवृक्ष मंदिर 20 तास खुले राहणार आहे. तर गाणगापूर देवस्थाननेही मोठा निर्णय घेतला आहे.
सोलापूर: श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. दिवाळीच्या सणामुळे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने अक्कलकोटला येत आहेत. याच पार्श्वभूमीवर वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानने मोठा निर्णय घेतला असून मंदिर भाविकांसाठी 20 तास खुले केले आहे. तर भाविकांच्या सोयीसाठी श्रीक्षेत्र गाणगापूर येथील श्री दत्त मंदिरात देखील 18 तास दर्शन सुरू राहील.
अक्कलकोट मंदिर 20 तास खुले
सणासुदीच्या काळात अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे पहाटे 3 ते रात्री 11 असे नियमितपणे 20 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
advertisement
गाणगापूर मंदिरात 18 तास दर्शन
view commentsश्रीक्षेत्र गाणगापूर येथे दिवाळीनिमित्त विविध अभिषेक, पालखी, मंगलस्नान असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिवाळी उत्सवानिमित्त पहाटे 3 ते रात्री 9 असे 18 तास गाणगापूर दत्तात्रय मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. पहाटेपासून दुपारी 12 पर्यंत विधिवत पूजा, अभिषेक असणार आहे. एक वाजता निर्गुण पादुका मूळस्थान दर्शन बंद करण्यात येणार आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
October 18, 2025 12:01 PM IST
मराठी बातम्या/Temples/
दिवाळीत अक्कलकोट, गाणगापूरला जाताय? मंदिरांच्या दर्शन वेळा बदलल्या, भाविकांसाठी महत्त्वाची बातमी!