Ashadhi Wari 2025: आता विठुरायाला कधीही भेटता येणार, आषाढीनिमित्तानं 24 तास दर्शनाची सोय

Last Updated:

Ashadhi Wari 2025: आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी लक्षात घेता विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. यावर्षी आषाढी एकादशी 6 जुलै रोजी आहे.

News18
News18
सोलापूर: आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी लक्षात घेता विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. यावर्षी आषाढी एकादशी 6 जुलै रोजी आहे. यात्रेचा कालावधी 26 जून ते 10 जुलै असा आहे. या आषाढी यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना मंदिर समिती मार्फत मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांचे सुलभ आणि जलद दर्शन व्हावे यासाठी 27 जून पासून 24 तास दर्शन व्यवस्था उपलब्ध होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता मंदिर जतन आणि संवर्धन आराखड्यांचा कामाचा आढावा घेण्यात आला. टोकन दर्शन प्रणालीची 15 जूनला पहिली चाचणी घेण्यात येणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले.
advertisement
तसेच आषाढी यात्रेत भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन उपलब्ध करून देण्यावर मंदिर समितीचा भर राहणार आहे. दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून वॉटरप्रुफ मंडप, 4+6 पत्राशेड, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, लाईव्ह दर्शन, कुलर फॅन, सार्वजनिक सूचना प्रणाली, मिनरल वॉटर, सुरक्षा रक्षक नियुक्ती, आपत्कालिन सुविधा, चहा खिचडी वाटप असणार आहे. तसेच आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल, 24 तास अन्नछत्र, बँग स्कॅनर मशिन, हिरकणी कक्ष, नदीपात्रात चेंजिंग रूम इत्यादी स्वरूपाच्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्याबाबतची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Ashadhi Wari 2025: आता विठुरायाला कधीही भेटता येणार, आषाढीनिमित्तानं 24 तास दर्शनाची सोय
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement