तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शन व्यवस्थेत महत्त्वाचे बदल, गाभाऱ्यातील दर्शन बंद, पुन्हा कधी सुरु होणार?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
तुळजाभवानी माता मंदिर परिसरातील भाविकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. तुळजाभवानी मातेचे गाभाऱ्यातील दर्शन मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बंद करण्यात आले आहे.
धाराशिव : समस्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे असलेली तुळजाभवानी माता प्रसिद्ध आहे. राज्यभरातून लोक तुळजापूर येथे भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. विवाहनंतर प्रत्येक जोडपे तुळजाभवानीचे दर्शन घेऊनच सुखी संसाराची सुरुवात करतात. तुळजाभवानी माता मंदिर परिसरातील भाविकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. तुळजाभवानी मातेचे गाभाऱ्यातील दर्शन मंदिराच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने बंद करण्यात आले आहे.
भाविकांना कोणतीही सूचना न देता गाभाऱ्यातील दर्शन बंद करण्यात आल्याने भाविकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. बांधकाम सुरू असल्याने देवीच्या दर्शन व्यवस्थेत भाविकांना सूचना न देता मंदिर संस्थांनी केला बदल करण्यात आला आहे. तुळजाभवानीचे दर्शन आरती पॉईंट खिडकीतून सध्याच्या घडीला सुरू आहे. मंगळवारी पहाटेपर्यंत दर्शन पूर्वत होऊ शकते. तोपर्यंत मात्र भाविकांना गाभाऱ्यातून देवीचे दर्शन घेता येणार नाही.
advertisement
कोणतीही पूर्वसूचना न देता दर्शन व्यवस्थेत बदल केल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांमध्ये मात्र नाराजी पाहायला मिळत आहे. 24 तास दुरुस्तीचे काम सुरू असताना देखील भाविकांना कोणतीही पूर्व सूचना न देता गैरसोय सहन करावी लागत आहे. मंगळवारी सकाळपर्यंत दर्शन व्यवस्था पूर्ववत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
January 06, 2025 9:16 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शन व्यवस्थेत महत्त्वाचे बदल, गाभाऱ्यातील दर्शन बंद, पुन्हा कधी सुरु होणार?