पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी बातमी, विठ्ठल-रुक्मिणी मातेची पाद्यपूजा 11 दिवस राहणार बंद
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या भाविकांसाठी मोठी बातमी आहे. विठ्ठल-रुक्मिणी मातेची पाद्यपूजा बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
विरेंद्रसिंह उत्पात - प्रतिनिधी
सोलापूर : पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या भाविकांसाठी मोठी बातमी आहे. विठ्ठल-रुक्मिणी मातेची पाद्यपूजा बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. येत्या 21 ते 31 डिसेंबर पर्यंत पाद्यपूजा बंद राहण्याची माहिती समोर आली आहे.
का घेण्यात आला निर्णय?
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आणि कोट्यावधी वारकऱ्यांचे आराध्य दैवत म्हणून पंढरपूरचे विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे. पंढरपुरला दक्षिण काशी असेही संबोधले जाते. अशातच विठ्ठल मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला आहे. नाताळ सहइतर सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढणार आहे. दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे.
advertisement
पाद्य पूजेच्या माध्यमातून विठू भक्तांना थेट देवाच्या चरणाची पूजा करण्याची संधी मिळते. मात्र नाताळच्या सुट्ट्या आणि वर्षा अखेरच्या पर्यटनामुळे भाविकांची प्रचंड गर्दी वाढल्याने सलग अकरा दिवस पाद्यपूजा राहणार बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापना वरील गर्दीचा ताण लक्षात घेता पाद्यपूजा अकरा दिवस बंद राहणार आहे. पाद्य पूजेसाठी पाच हजार रुपये देणगी शुल्क आकारून पाच भाविकांना चरण सेवा करण्याची संधी मिळते.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Dec 08, 2025 1:30 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी बातमी, विठ्ठल-रुक्मिणी मातेची पाद्यपूजा 11 दिवस राहणार बंद









