प्रसिद्ध वेरूळच्या 'घृष्णेश्वर' मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; मंदिराचा इतिहास आणि कथा काय जाणून घेऊ!
- Published by:
- local18
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
12 ज्योतिर्लिंग यात्रेत महत्वाचं आणि शेवटचं ज्योतिर्लिंग अशी मान्यता असलेलं, छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील 'घृष्णेश्वर' मंदिर आहे. भाविकांची रात्रीपासून अलोट गर्दी या ठिकाणी दर्शनासाठी होत असते.
छत्रपती संभाजीनगर : श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून आज 28 जुलै रोजी पहिला श्रावण सोमवार आहे. त्यामुळे सर्वच शिव मंदिरात भक्तांची गर्दी होते. 12 ज्योतिर्लिंग यात्रेत महत्वाचं आणि शेवटचं ज्योतिर्लिंग अशी मान्यता असलेलं, छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील 'घृष्णेश्वर' मंदिर आहे. भाविकांची रात्रीपासून अलोट गर्दी या ठिकाणी दर्शनासाठी होत असते. पहाटेपासूनच शिवभक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे.
भारत देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे आणि प्रसिद्ध असलेले 'घृष्णेश्वर' मंदिर आहे. घृष्णेश्वर मंदिराची कथा आणि इतिहास असा आहे की, सुधर्मा नावाचे ब्राह्मण या ठिकाणी होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुधेया होते. त्यांचे कुटुंब सनातनी होते. पहिल्या पत्नीकडून मुलबाळ न मिळाल्यामुळे सुधर्माला दुसरे लग्न करावे लागले. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव घृष्णा होते. घृष्णा या ज्योतिर्लिंगाची स्थापना करून दररोज पूजापाठ आणि विसर्जन करत असत. त्यांच्या तपश्चर्येमुळे हे मंदिर घृष्णेश्वर नावाने प्रसिद्ध झाले असल्याचे ॲड. पुजारी रावसाहेब पंडितराव शास्त्री यांनी लोकल 18 सोबत बोलतांना सांगितले.
advertisement
'घृष्णेश्वर' मंदिराची ख्याती केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही पसरलेली आहे. त्यामुळे देश-विदेशातूनही अनेक भाविक या पवित्र स्थानी दर्शनासाठी आवर्जून येतात. श्रावणासारख्या पवित्र महिन्यात तर येथील धार्मिक महत्त्व आणखीनच वाढते, ज्यामुळे मंदिरामध्ये दररोज आणि विशेषतः सोमवारी मोठ्या संख्येने भाविकांचा ओघ सुरू असतो आणि असेच चित्र सध्या वेरूळमध्ये पाहायला मिळत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 28, 2025 5:51 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
प्रसिद्ध वेरूळच्या 'घृष्णेश्वर' मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; मंदिराचा इतिहास आणि कथा काय जाणून घेऊ!