महाराष्ट्रातील असं मंदिर जिथं गूळ-फुटाणे अर्पण केल्याने बरा होतो जुनाट खोकला, काय आहे आख्यायिका?
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अनेक दवाखाने करून देखील हा खोकला राहत नसल्यास मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक अशा मोठमोठ्या शहरातून भाविक या ठिकाणी येतात. या ठिकाणी मारुतीला गूळ-फुटाणे अर्पण केल्यानंतर कितीही जुनाट प्रकारचा खोकला असल्यास तो बरा होत असल्याची गावकऱ्यांची समजूत आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : आपल्या देशात अनेक प्राचीन पुरातन मंदिर आहे आणि या मंदिरांशी संबंधित काही पुरातन आख्यायिका देखील आहेत. जालना जिल्ह्यातील मौजपुरी येथील डांग्या मारुती मंदिर हे देखील असंच एक प्राचीन मंदिर. एखाद्या व्यक्तीला बरेच दिवस झाले खोकला आहे. अनेक दवाखाने करून देखील हा खोकला राहत नसल्यास मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक अशा मोठमोठ्या शहरातून भाविक या ठिकाणी येतात. या ठिकाणी मारुतीला गूळ-फुटाणे अर्पण केल्यानंतर कितीही जुनाट प्रकारचा खोकला असल्यास तो बरा होत असल्याची गावकऱ्यांची समजूत आहे.
advertisement
जालना जिल्ह्यातील मौजपुरी हे एक छोटसं गाव. या गावात प्रत्येक गावात असतं असं एक मारुतीचे मंदिर देखील आहे. परंतु गावापासून थोड्याशा अंतरावर शेतामध्ये डांग्या मारुती म्हणून प्रसिद्ध असं पुरातन आणखी एक मंदिर आहे. तसेच नदीच्या दुसऱ्या बाजूला धांडेगाव शिवारात दुसरे एक मारुतीचे मंदिर आहे. त्या दोन्ही मारुतीच्या मंदिराच्या ठिकाणी जुन्या काळामध्ये दोन गावे असतील. प्लेग किंवा अन्य साथींमध्ये गावातील गावकरी मरण पावले असतील आणि केवळ हे मारुतीची मंदिरेच शिल्लक राहिली असतील अशी गावकऱ्यांची धारणा आहे.
advertisement
या दोन्ही मारुतींना डांग्या मारुती म्हणून ओळखलं जातं. कितीही जुनाट प्रकारचा डांग्या खोकला असल्यास या दोन मारुतींना गूळ-फुटाणे अर्पण करून या गूळ फुटाण्यांचं सेवन केल्यास हा खोकला बरा होतो असं गावकरी यांचे म्हणणं आहे. परिसरातील नागरिकांबरोबर दूरच्या शहरावरून लोक या ठिकाणी मारुतीचे दर्शन घेण्यासाठी व गूळ-फुटाणे अर्पण करण्यासाठी येतात. मौजपुरी येथील मारुती मंदिरात यंदा जीर्णोद्धार होणार आहे. त्यामुळे हनुमान जयंतीला इथे मोठा कार्यक्रम असणार असल्याचे गावातील नागरिकांनी सांगितले.
advertisement
कुणाला जुनाट खोकला असेल आणि तो राहत नसेल तर ते इथे येतात व देवालागूळ-फुटाणे अर्पण करतात. तसेच मंदिराच्या शिखरावर गूळ-फुटाणे फेकतात व ते हाताने चिलतात. हे जिल्हे गूळ-फुटाणे सेवन केल्यानंतर जुनाट प्रकारचा खोकला नाहीसा होतो, असं मंदिराचे पुजारी राम बळप यांनी सांगितले.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Mar 29, 2025 4:23 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
महाराष्ट्रातील असं मंदिर जिथं गूळ-फुटाणे अर्पण केल्याने बरा होतो जुनाट खोकला, काय आहे आख्यायिका?







