Nashik News: VIP दर्शन बंद, पहाटेपासूनच मंदिर खुले, श्रावण मासनिमित्त नाशिकची प्रसिद्ध मंदिरे सज्ज

Last Updated:

Shravan Month: श्रावण महिन्यात नाशिकमधील शिवमंदिरांत भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा मंदिराच्या वेळांत बदल करण्यात आले असून व्हीआयपी दर्शनही बंद केले जाणार आहेत.

Nashik News: VIP दर्शन बंद, पहाटेपासूनच मंदिर खुले, श्रावण मासनिमित्त नाशिकच्या प्रसिद्ध मंदिरांची तयारी
Nashik News: VIP दर्शन बंद, पहाटेपासूनच मंदिर खुले, श्रावण मासनिमित्त नाशिकच्या प्रसिद्ध मंदिरांची तयारी
नाशिक: हिंदू धर्मातील पवित्र श्रावण मासाला शुक्रवार, 25 जुलैपासून सुरुवात झाली आहे. नाशिक शहरातील सर्व शिव मंदिरांत या काळात भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिर प्रशासनाकडून या गर्दीचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या 28 जुलैला पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शहरातील प्रमुख कपालेश्वर, सोमेश्वर, नीळकंठेश्वर, मनकामेश्वर, नाशिकरोडच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी हजारो भाविक येणार आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनेदेखील उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
भारतात प्रसिद्ध असलेले कपालेश्वर आणि सोमेश्वर मंदिर पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे 4 पासून रात्री 12 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा भाग म्हणून बहुतांश शिवमंदिरांमध्ये दीप अमावास्येपासूनच मंदिरांचे आवार विद्युत रोषणाईने झळाळून निघाले आहे.
advertisement
पहाटे 5 वा महारुद्राभिषेक
श्रावण सोमवारी कपालेश्वर आणि सोमेश्वर मंदिरात पहाटे 5 वाजता महारुद्राभिषेक, महापूजन आणि महाआरती आदी धार्मिक उपक्रमांनंतर नित्यसेवेस सुरुवात होणार आहे. कपालेश्वर मंदिर रात्री 12 वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे. तरी भाविकांनी या ठिकाणी गर्दी करू नये, असे मंदिर ट्रस्टींनी आवाहन केले आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद
12 जोतिर्लिंगांपैकी एक नाशिकमध्ये असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर हे श्रावणात पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. गर्दीत गैरसोय होऊ नये याकरता गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सोमवारी सर्व व्हीआयपी दर्शन बंद करण्यात येणार आहे. तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी वातानुकूलित दर्शन बारीची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Nashik News: VIP दर्शन बंद, पहाटेपासूनच मंदिर खुले, श्रावण मासनिमित्त नाशिकची प्रसिद्ध मंदिरे सज्ज
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement