Temple : महाराष्ट्रातील एक असं ठिकाण जिथे सात कुंड, स्वयंभू आहे शिवलिंग, भुयारात सतत वाहतो पाण्याचा प्रवाह, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
येथील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंगावर सतत दुधाची धार पडत होती, असं तेथील नागरिक सांगतात. त्याचबरोबर येथील शिवलिंगाजवळून एक भुयार आहे, ते भुयार सालबर्डी येथे निघत असल्याचं देखील गावकरी सांगतात.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात गव्हाणकुंड म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे. त्याला कपिलेश्वर देवस्थान म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण अमरावती जिल्ह्यांत खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणचे विशेष म्हणजे येथे नैसर्गिकरित्या तयार झालेले सात कुंड आहेत. त्या प्रत्येक कुंडाला नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबर येथील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंगावर सतत दुधाची धार पडत होती, असं तेथील नागरिक सांगतात. त्याचबरोबर येथील शिवलिंगाजवळून एक भुयार आहे, ते भुयार सालबर्डी येथे निघत असल्याचं देखील गावकरी सांगतात.
नैसर्गिकरित्या तयार झालेले सात कुंड
कपिलेश्वर देवस्थानाबाबत माहिती देत असताना तेथील ग्रामस्थ मदन महाराज सांगतात की, या ठिकाणी सात कुंड आहेत. त्याची निर्मिती खूप पूर्वीची आहे आणि ते कुंड नैसर्गिकरित्या तयार झालेले आहे. त्या सातही कुंडांला नावं आहेत. पहिला म्हणजे म्हैस कुंड, या कुंडात म्हशी पोहत असल्याने त्याला म्हैस कुंड म्हणतात. दुसरा आहे नंदी कुंड, या कुंडात बैल पोहणी लावता येत असल्याने त्याला नंदी कुंड किंवा बैल कुंड असे म्हणतात. तिसरा आहे माणूस कुंड, या कुंडात माणसं पोहत असल्याने याला माणूस कुंड म्हणतात.
advertisement
चौथा आहे विहीर कुंड, विहिरीसारखा खोल आणि त्याला कपाऱ्या असल्याने विहीर कुंड म्हणून ओळखल्या जाते. पाचवा आहे पाखर कुंड, या ठिकाणी पाखर किलबिल करतात आणि पाणी पितात म्हणून त्याला पाखर कुंड म्हणतात. सहावा आहे ताबूत कुंड, या ठिकाणी मोहरमचे ताबूत शिरवतात म्हणून त्याला ताबूत कुंड असे म्हटले जाते. सातवा आणि शेवटचा कुंड आहे अप्सरा कुंड, या ठिकाणी महिला आंघोळ करत होत्या म्हणून त्याला अप्सरा कुंड असे म्हटले जाते. सातही कुंडांचे वेगवेगळे वैशिष्ट्ये आहेत, असे ग्रामस्थ सांगतात.
advertisement
येथील मंदिराची आख्यायिका काय?
मदन महाराज पुढे सांगतात की, या मंदिराच्या ठिकाणी आधी काहीच नव्हतं. फक्त या देवता नदी पात्रात सात कुंड होती. त्यानंतर जवळपास 200 वर्षांपूर्वी गव्हाणकुंड येथील लक्ष्मणराव पाटील यांच्या स्वप्नात कपिलेश्वर ऋषी गेलेत आणि त्यांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर पाटील आणि त्यांचे काही मित्र या ठिकाणी आलेत आणि येथील पाहणी केली. तेव्हा आता आहे त्याच अवस्थेत हे भुयार, शिवलिंग हे सर्व त्यांना दिसलं. तेव्हापासून या स्थळाची प्रचिती झाली. त्या काळात तेथील शिवलिंगावर दुधाची धार पडत असल्याचं देखील ते सांगतात.
advertisement
भुयारात सतत पाण्याचा प्रवाह सुरूच
येथील भुयारात बाराही महिने पाणी असते. कधीच कोरडे पडत नाही. ज्या ठिकाणाहून आधी दुधाची धार पडत होती. तेथूनच आता पाण्याचा प्रवाह सुरू आहे. उन्हाळ्यात कितीही तापमान वाढेल तरीही येथील पाण्याचा झरा बंद होत नाही. या ठिकाणी भुयारात आणखी एक अमृत कुंड देखील आहे. स्वयंभू शिवलिंग, नाग, नंदी आणि इतर तेथील सर्व रचना ही स्वयंभू आहे, असे तेथील ग्रामस्थ सांगतात.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
May 23, 2025 4:02 PM IST
मराठी बातम्या/Temples/
Temple : महाराष्ट्रातील एक असं ठिकाण जिथे सात कुंड, स्वयंभू आहे शिवलिंग, भुयारात सतत वाहतो पाण्याचा प्रवाह, Video