नवऱ्याशी भांडण झाल्यावर बायकोनं काय करावं? वास्तूशास्त्रात दिलाय जबरदस्त उपाय
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
भांडण हे प्रत्येक नात्यात होतं, त्यातूनच नातं घट्ट होत जातं. पण जर वाद सतत होत असतील, त्यातून असह्य मनस्ताप होत असेल तर मात्र ते नातं हळूहळू संपुष्टात यायला वेळ लागत नाही.
मोहित भावसार, प्रतिनिधी
शाजापूर : नवरा-बायकोत प्रेम असेल तरच संसार उत्तम होतो, असं म्हणतात. सुखी संसारासाठी विश्वास आणि समजूतदारपणासह अनेक बाबी महत्त्वाच्या असतात. काहीजणांना लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस अनुभवायला मिळतात. म्हणजे काही दिवस एवढे आनंदात जातात की, आपल्यासारखे नशीबवान आपणच असं वाटू लागतं, परंतु नंतर मात्र अगदी साध्या-साध्या गोष्टींवरून खटके उडायला सुरुवात होते. भांडण हे प्रत्येक नात्यात होतं, त्यातूनच नातं घट्ट होत जातं. पण जर वाद सतत होत असतील, त्यातून असह्य मनस्ताप होत असेल तर मात्र ते नातं हळूहळू संपुष्टात यायला वेळ लागत नाही. म्हणूनच नवरा-बायकोच्या भांडणावर वेळीच उपाय करणं आवश्यक असतं.
advertisement
वास्तूशास्त्र सांगतं की, आपला स्वभाव, विचारसरणी आपल्या जगण्यावर प्रभाव करत असतेच, शिवाय आजूबाजूच्या वस्तू आणि वातावरणाचाही आपल्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे संसार सुखाचा व्हावा यासाठी वास्तूशास्त्रातही काही नियम दिलेले आहेत. ज्योतिषी गिरजेश चतुर्वेदी यांनी याबाबत सविस्तर माहिती सांगितलीये.
हेही वाचा : शनी पाठीशी, मग कसली भीती? 6 जून रोजी 5 राशींची चांदीच चांदी!
जोतिषांनी म्हटलं की, अडचणी हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, सुख-दुःख एकामागून एक येतच असतात. परंतु संसारात जर सतत असह्य अडचणींचा सामना करावा लागत असेल तर नवरा किंवा बायकोने आपल्या बेडरूममध्ये लव्ह बर्ड्सचं चित्र लावावं. यामुळे संसारात हळूहळू गोडवा निर्माण होतो. शिवाय आपल्या बेडरूममध्ये खरेखुरे लव्ह बर्ड्स पाळले तर उत्तमच, त्यामुळे संसार सुखाचा होण्यास वेळ लागणार नाही, असं ज्योतिषांनी सांगितलं.
advertisement
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, लव्ह बर्ड्समुळे नवरा-बायकोच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ लागतात. म्हणूनच दोघांचंही मन प्रसन्न आणि शांत राहतं, ज्याचा फायदा संसारात होतो. तसंच पिवळ्या रंगाचे, नारंगी रंगाचे लव्ह बर्ड्स पाळणं शुभ ठरतं, असं ज्योतिषांनी सांगितलं.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Shajapur,Madhya Pradesh
First Published :
Jun 05, 2024 4:30 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
नवऱ्याशी भांडण झाल्यावर बायकोनं काय करावं? वास्तूशास्त्रात दिलाय जबरदस्त उपाय










