देवाचं नव्हे, तर 'हे' मंदिर आहे एका चोराचं! दर्शन घेण्यासाठी लागते भक्तांची रांग, अनोखी कथा ऐकून व्हाल थक्क!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
चित्रकूटच्या गुप्त गोदावरीमध्ये असलेल्या ‘खटखटा चोर’ मंदिरात एक अनोखी परंपरा आहे. येथे एका राक्षसाची पूजा केली जाते, जो रामायण काळात सीतेचे वस्त्र चोरणारा होता. लक्ष्मणाने त्याला शिक्षा दिली, पण...
Unique Temple : माणूस अडचणीत सापडला की, त्याची सगळी आशा देवावर असते. हिंदू धर्मात देव-देवतांच्या पूजेबद्दल सगळ्यांना माहिती आहे. लोकांचा आपल्या देवावर खूप विश्वास असतो. तासनतास चालूनही लोकं आपल्या देवाच्या दर्शनाची संधी सोडत नाहीत. अशा परिस्थितीत, जर आम्ही तुम्हाला एका अशा मंदिराविषयी आणि अशा जागेविषयी सांगितलं, जिथे चोराची पूजा केली जाते, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, नाही का? तुम्हाला वाटेल, काय मूर्खपणा आहे. पण, हे खरं आहे. देशात एक असं धार्मिक स्थळ आहे, जिथे चोराची पूजा करण्यासाठी लोकांना लांब रांगांमध्ये उभं राहावं लागतं. होय, आम्ही बोलतोय चित्रकूटच्या गुप्त गोदावरीमध्ये असलेल्या रामायण काळातील खटखटा चोराच्या मंदिराविषयी...
भक्तांसाठी हा खटखटा चोर देवापेक्षा कमी नाही
असं म्हणतात की, चित्रकूटच्या गुप्त गोदावरीमध्ये असलेल्या खटखटा चोराची पूजा केल्यास, केवळ सगळ्या समस्यांपासून मुक्ती मिळते, असं नाही, तर इथे दर्शन घेणाऱ्या भक्तांच्या घरात चोरी होत नाही, अशीही श्रद्धा आहे. इथे खटखटा चोर नावाच्या राक्षसाची मूर्ती आहे. हे नाव ऐकूनही भाविकांची गर्दी कमी होत नाही. देव-देवतांचं जीवन कठीण करणाऱ्या राक्षसाची पूजा कशी आणि का केली जाते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण, भक्तांसाठी हा खटखटा चोर देवापेक्षा कमी नाही.
advertisement
प्रभू श्रीरामाने दिला विशेष आशीर्वाद
अशी श्रद्धा आहे की, खटखटा चोराला पूजेचा आशीर्वाद खुद्द प्रभू श्रीरामांनी दिला होता. ही गोष्ट त्रेता युगातील आहे. जेव्हा वनवासात प्रभू राम चित्रकूटला पोहोचले, तेव्हा त्यांना अनेक राक्षसांचा सामना करावा लागला. त्यातील एक राक्षस होता मयंक. स्कंद पुराणानुसार, एकदा सीता मातेने गोदावरी नदीत स्नान करत असताना, मयंक राक्षसाने तिची दिव्य वस्त्रं चोरली. ही वस्त्रं सती अनुसयाने सीता मातेला दिली होती. वस्त्रं चोरीला गेल्यामुळे सीता माता खूप दुःखी झाली. लक्ष्मणाने त्या राक्षसाचा पाठलाग केला आणि त्याच्यावर असा बाण मारला, की तो दगड बनू लागला. मयंकला त्याची चूक कळली. त्याने रामाकडे क्षमा मागितली. त्याच्या प्रार्थनेने राम द्रवले. प्रभू रामाने त्याला आशीर्वाद दिला की, कलियुगात तुझी भक्तांचे पाप नष्ट करणारा देव म्हणून पूजा केली जाईल.
advertisement
आजही गोदावरी या गुहेत गुप्तपणे वाहते
रामाच्या आशीर्वादानंतर, खटखटा चोराची ही मूर्ती पापमोचनी शिला म्हणून ओळखली जाऊ लागली. पाप नष्ट करण्याच्या विशेष वैशिष्ट्यामुळे, या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. ही मूर्ती गुहेतील दगडांमध्ये अशा प्रकारे अडकली आहे, की ती हलवता येते. त्यामुळेच तिला खटखटा चोर म्हणतात. असं म्हणतात की, प्रभू रामांच्या तपस्थली चित्रकूटमध्ये, अडचणीत सापडलेल्या लोकांना शांती मिळते. ते राक्षस असले तरीही. प्रभू रामांची हीच महिमा आहे, की इथे राक्षससुद्धा पापांचे नाश करणारे बनतात. जेव्हा प्रभू श्री राम आणि सीता चित्रकूटला पोहोचले, तेव्हा नाशिकहून गोदावरी नदी त्यांच्या दर्शनासाठी एका गुहेत गुप्तपणे प्रकट झाली आणि प्रभू राम आणि जानकीला दर्शन दिलं. आजही गोदावरी या गुहेत गुप्तपणे वाहते. थोडं पुढे गेल्यावर ती अदृश्य होते. त्यामुळेच तिला गुप्त गोदावरी म्हणतात.
advertisement
हे ही वाचा : कुत्र्याचा झाला मृत्यू, विरह सहन होईना, महिलेने खर्च केले 19 लाख अन् पुन्हा जिवंत केला कुत्रा!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 14, 2025 5:27 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
देवाचं नव्हे, तर 'हे' मंदिर आहे एका चोराचं! दर्शन घेण्यासाठी लागते भक्तांची रांग, अनोखी कथा ऐकून व्हाल थक्क!