Ganesh Chaturthi: गणेशाची ही 108 नावं, 10 दिवसांपर्यंत करा याचा जप, आयुष्यातील सर्व अडचणी होतील दूर

Last Updated:

कोणत्या नावांचा कराल जप?

रत्नागिरीत गणेशोत्सव काळात 'हे' नियम पाळावेच लागणार
रत्नागिरीत गणेशोत्सव काळात 'हे' नियम पाळावेच लागणार
अयोध्या, 19 सप्टेंबर : संपूर्ण देशात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सनातन धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गणेशाची उपासना केली जाते. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. आणि गणेश चतुर्थीपासून पुढील 10 दिवस गणपती बाप्पाला घरात स्थापित करून त्याची मनोभावे पूजा केली जाते.
धार्मिक मान्यतानुसार, भगवान गणेशाची उपासना केल्याने आयुष्यातील दु:ख दूर होतात. आणि सुख समृद्धी मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार, गणेश उत्सवादरम्यान जातक भगवान गणेशाचे 108 नावांचा जप केला तर जीवनातील सर्व प्रकारचे त्रास दूर होतात. अयोध्याचे प्रकांड विद्वान पवन दास शास्त्रींनी सांगितलं की, विघ्नहर्ता मंगल कर्ता गणपती बाप्पाची अनेक नावं आहेत. जर जातक गणेश चतुर्थीदरम्यान गणपती बाप्पाच्या 108 नावांची उपासना केल्याने आयुष्यातील सर्व त्रास दूर होतात.
advertisement
गणेशाचे 108 नावं
ॐ गणेश्वराय नमः, ॐ गणाध्यक्षाय नमः, ॐ गणाराध्याय नमः, ॐ गणप्रियाय नमः, ॐ गणनाथाय नमः, ॐ गणस्वामिने नमः, ॐ गणेशाय नमः, ॐ गणनायकाय नमः, ॐ गणमूर्तये नमः, ॐ गणपतये नमः, ॐ गणत्रात्रे नमः, ॐ गणंजयाय नमः, ॐ गणपाय नमः, ॐ गणक्रीडाय नमः, ॐ गणदेवाय नमः, ॐ गणाधिपाय नमः, ॐ गणज्येष्ठाय नमः, ॐ गणश्रेष्ठाय नमः, ॐ गणप्रेष्ठाय नमः, ॐ गणाधिराजाय नमः, ॐ गणराजे नमः, ॐ गणगोप्त्रे नमः, ॐ गणाङ्गाय नमः, ॐ गणदैवताय नमः, ॐ गणबंधवे नमः, ॐ गणसुहृदे नमः, ॐ गणाधीशाय नमः, ॐ गणप्रदाय नमः, ॐ गणप्रियसखाय नमः, ॐ गणप्रियसुहृदे नमः, ॐ गणप्रियरतोनित्याय नमः, ॐ गणप्रीतिविवर्धनाय नमः, ॐ गणमण्डलमध्यस्थाय नमः, ॐ गणकेलिपरायणाय नमः, ॐ गणाग्रण्ये नमः, ॐ गणेशाय नमः, ॐ गणगीताय नमः, ॐ गणोच्छ्रयाय नमः, ॐ गण्याय नमः, ॐ गणहिताय नमः, ॐ गर्जद्गणसेनाय नमः, ॐ गणोद्यताय नमः, ॐ गणप्रीतिप्रमतनाय नमः, ॐ गणप्रीत्यपहारकाय नमः, ॐ गणनार्हाय नमः, ॐ गणप्रौढाय नमः, ॐ गणभर्त्रे नमः, ॐ गणप्रभवे नमः, ॐ गणसेनाय नमः, ॐ गणचराय नमः, ॐ गणप्राज्ञाय नमः, ॐ गणैकराजे नमः, ॐ गणाग्र्याय नमः, ॐ गण्यनाम्ने नमः, ॐ गणपालनतत्पराय नमः, ॐ गणजिते नमः, ॐ गणगर्भस्थाय नमः, ॐ गणप्रवणमानसाय नमः, ॐ गणगर्वपरिहर्त्रे नमः, ॐ गणाय नमः, ॐ गणनमस्कृते नमः, ॐ गणार्चितांघ्रियुगलाय नमः, ॐ गणरक्षणकृते नमः, ॐ गणध्याताय नमः, ॐ गणगुरवे नमः, ॐ गणप्रणयतत्पराय नमः, ॐ गणागणपरित्रात्रे नमः, ॐ गणादिहरणोदराय नमः, ॐ गणसेतवे नमः, ॐ गणनाथाय नमः, ॐ गणकेतवे नमः, ॐ गणाग्रगाय नमः, ॐ गणहेतवे नमः, ॐ गणग्राहिणे नमः, ॐ गणानुग्रहकारकाय नमः, ॐ गणागणानुग्रहभुवे नमः, ॐ गणागणवरप्रदाय नमः, ॐ गणस्तुताय नमः, ॐ गणप्राणाय नमः, ॐ गणसर्वस्वदायकाय नमः, ॐ गणवल्लभमूर्तये नमः, ॐ गणभूतये नमः, ॐ गणेष्ठदाय नमः, ॐ गणसौख्यप्रदाय नमः, ॐ गणदुःखप्रणाशनाय नमः, ॐ गणप्रथितनाम्ने नमः, ॐ गणाभीष्टकराय नमः, ॐ गणमान्याय नमः, ॐ गणख्याताअय नमः, ॐ गणवीताय नमः, ॐ गणोत्कटाय नमः, ॐ गणपालाय नमः, ॐ गणवराय नमः, ॐ गणगौरवदाय नमः, ॐ गणगर्जितसंतुष्टाय नमः, ॐ गणस्वच्छंदगाय नमः, ॐ गणराजाय नमः, ॐ गणश्रीदाय नमः, ॐ गणभीतिहराय नमः, ॐ गणमूर्धाभिषिक्ताय नमः, ॐ गणसैन्यपुरःसराय नमः, ॐ गुणातीताय नमः, ॐ गुणमयाय नमः, ॐ गुणत्रयविभगकृते नमः, ॐ गुणिने नमः, ॐ गुणकृतिधराय नमः, ॐ गुणशालिने नमः, ॐ गुणप्रियाय नमः
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganesh Chaturthi: गणेशाची ही 108 नावं, 10 दिवसांपर्यंत करा याचा जप, आयुष्यातील सर्व अडचणी होतील दूर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement