Valentine's Day : धाकधूक वाढली, कसा असेल उद्याचा दिवस? 'या' राशीच्या व्यक्तींनी शांत झोपावं
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
कोणत्याही नात्यात ग्रह, नक्षत्रांची स्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण असते. कारण एका ठराविक कालांतराने ग्रह राशीपरिवर्तन करतात. त्यांच्या सध्याच्या स्थितीमुळे कोणत्या राशींच्या आयुष्यात प्रेम येणार पाहूया.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : सध्या शुक्र मकर राशीत आहे. जिथे आधीपासूनच मंगळ आणि बुध ठाण मांडून होते. तर दुसरीकडे सूर्याचा कुंभ राशीत प्रवेश झाला आहे, जिथे शनी आधीपासून विराजमान होता. व्हॅलेंटाईन वीकदरम्यान घडलेल्या या सर्व ग्रहांच्या राशीबदलांचा सर्व 12 राशींवर परिणाम झाला आहे. विशेषतः प्रेमावर आणि रिलेशनशिपवर याचा परिणाम जाणवेल.
शुक्र आणि सूर्याच्या राशीपरिवर्तनामुळे काही राशींच्या व्यक्तींची लव्ह लाइफ रोमँटिक होईल. अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, कोणत्याही नात्यात ग्रह, नक्षत्रांची स्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण असते. कारण एका ठराविक कालांतराने ग्रह राशीपरिवर्तन करतात. त्यांच्या सध्याच्या स्थितीमुळे कोणत्या राशींच्या आयुष्यात प्रेम येणार पाहूया.
advertisement
मेष : आपल्यासाठी व्हॅलेंटाईन डे अत्यंत खास असणार आहे. आपलं नातं आणखी बहरेल, भक्कम होईल. पार्टनरसोबत लग्न करायचं असल्यास हा कालावधी उत्तम आहे.
कन्या : आपल्याला पार्टनरसोबत नवनवीन गोष्टी एक्स्प्लोर करण्याची संधी मिळेल. तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करायचं असेल, तर ही वेळ अनुकूल आहे. याच काळात आपलं लग्न झाल्यास संसार सुखाचा होईल.
advertisement
तूळ : आपल्याला प्रेमासंबंधित अनेक चांगले प्रसंग अनुभवायला मिळतील. पार्टनरसोबत छान लांबचा प्रवास होईल. लग्नाचाही योग आहे.
मकर : आपल्याला या काळात कौटुंबिक सुख मिळणार आहे. शिवाय उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. याच काळात आपण आपल्या पार्टनरची ओळख कुटुंबियांशी करून देऊ शकता.
मीन : आपल्या आयुष्यात प्रचंड सुख आणि सकारात्मक ऊर्जा येणार आहे. लग्नासाठी हा कालावधी उत्तम आहे. बऱ्याच काळापासून पार्टनरसोबत असलेला दुरावा आता संपेल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsलेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
February 13, 2024 9:15 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Valentine's Day : धाकधूक वाढली, कसा असेल उद्याचा दिवस? 'या' राशीच्या व्यक्तींनी शांत झोपावं


