Vastu Tips: आघाडा नेईल आघाडीवर! या वनस्पतीच्या 5 सोप्या उपायांनी मोठ्या समस्याही होतील दूर
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Aghada Vastu Tips: आघाडा वनस्पती चांगल्या आर्द्रतेमध्ये गवतासोबत कुठेही वाढते. त्याचा विशिष्ट पद्धतीनं वापर केल्यास माणसाचे नशीब उजळू शकते. प्रत्येक व्यक्तीला जीवनातील सर्व भौतिक सुख मिळावे, असे वाटते. यासाठी तो कठोर परिश्रम करतो, परंतु...
मुंबई, 31 ऑक्टोबर : हिंदू धर्मात पिंपळ, तुळस, वड, शमी आणि अपराजिता या वृक्षांना विशेष महत्त्व आहे. या वनस्पती पूजनीय मानल्या जातात आणि तितक्याच चमत्कारिक आहेत. या वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म आणि दैवी गुणधर्म दोन्ही आहेत, असे मानले जाते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रात इतर काही वनस्पतींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामुळे व्यक्तीचे नशीब पालटण्यास मदत होते. यातील एक वनस्पती म्हणजे आघाडा. या लहानशा वनस्पतीला चिरचिटा असंही म्हणतात.
आघाडा वनस्पती चांगल्या आर्द्रतेमध्ये गवतासोबत कुठेही वाढते. त्याचा विशिष्ट पद्धतीनं वापर केल्यास माणसाचे नशीब उजळू शकते. प्रत्येक व्यक्तीला जीवनातील सर्व भौतिक सुख मिळावे, असे वाटते. यासाठी तो कठोर परिश्रम करतो, परंतु कधीकधी नशीब त्या व्यक्तीला साथ देत नाही. असं होऊ नये यासाठी आघाडा वनस्पतीच्या मुळापासून काही उपाय करू शकता. ज्योतिषी पं. ऋषिकांत मिश्रा शास्त्री यांच्याकडून जाणून घेऊया आघाडा वनस्पतीपासून करण्याचे सोपे उपाय.
advertisement
आघाडा वनस्पतीसाठी 4 सोपे उपाय -
वाणीत यश मिळेल : वास्तूनुसार लाल आघाड्याची छोटी फांदी दाताने चावली तर व्यक्तीला वाणीत यश मिळते. याचा अर्थ व्यक्ती जे काही म्हणेल, जी इच्छा ठेवेल ती खरे होईल. आघाडा महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पंचोपचार पद्धतीनुसार आघाड्याच्या मुळाची पूजा करून मंत्रोच्चार करून हातावर बांधून घ्या. असे केल्याने व्यक्तीला मोठ्या समस्यांपासून सुटका मिळते.
advertisement
घरात सुख-समृद्धी येईल : घरामध्ये आघाडा लावणं खूप शुभ मानले जाते. घरामध्ये योग्य ठिकाणी पांढरा आघाडा लावला तर तुम्हाला सुख-समृद्धी प्राप्त होते. तसेच शुभ्र आघाडा जाळून त्याची राख गाईच्या तूपात मिसळून सेवन केल्यास संततीचे सुख प्राप्त होते, असे मानले जाते.
मिळते वशिकरणाची शक्ती : ज्योतिषांच्या मते आघाड्याचे मूळ हातात घेऊन पाण्याने चोळल्याने व्यक्तीला वशिकरणाची शक्ती प्राप्त होते. आघाड्याची मुळे हातावर घेऊन चोळल्यानंतर त्याचा कपाळावर टिळा लावावा. याशिवाय रविवारी पुष्य नक्षत्रात या वनस्पतीचे मूळ गरोदर महिलेच्या कमरेभोवती एखाद्या धाग्याने बांधावे. ते साधेपणा आणि गतीचा प्रभाव तयार करेल.
advertisement
कार्य यशस्वी होईल : आघाडा ही जडीबुटी तसेच चमत्कारी वनस्पती मानली जाते. ती थंड हवामानात फुलते. घरातील कोणाला दृष्ट लागली असल्यास किंवा लग्न ठरले आणि तुटले तर पंचोपचारासह आघाड्याच्या मुळाची पूजा करून उजव्या हातावर धारण करा. तुम्हाला ते एक वर्षासाठी ठेवावे लागेल. असे केल्याने तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल.
advertisement
धनलाभ होईल : नवरात्री, दिवाळी किंवा कोणत्याही शुभसमयी आघाडा वनस्पतीचे मूळ घराच्या तिजोरीत ठेवल्यास धनलाभाचे योग जुळतात. याशिवाय रवि-पुष्य योगात आघाड्याच्या मुळाची पूजा केल्यानं जमिनीत गाडलेले धन मिळतं, असं मानलं जातं. त्याचबरोबर घरातून नकारात्मक शक्तीही नष्ट होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 31, 2023 9:04 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: आघाडा नेईल आघाडीवर! या वनस्पतीच्या 5 सोप्या उपायांनी मोठ्या समस्याही होतील दूर






