सावधान! लवकरच शुक्राचं नक्षत्र बदलणार, 'या' 4 राशींवर येणार संकटं; होऊ शकतं मोठं नुकसान
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
शुक्र ग्रह 26 जून रोजी कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करणार आहे, ज्याचा प्रभाव १२ राशींवर दिसून येईल. ज्योतिषाचार्य पं. कल्की राम यांच्या मते...
ज्योतिषशास्त्राचं मानवी जीवनावर खूप मोठं योगदान आहे. ग्रहांमध्ये आणि नक्षत्रांमध्ये बदल होत असतात, हे ज्योतिषानुसारच ठरतं. जेव्हा ग्रह ठराविक काळानंतर आपली रास बदलतात, तेव्हा ते अनेकदा नक्षत्रही बदलतात. याचा 12 राशींच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे परिणाम होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह प्रेम आणि संपत्तीचं प्रतीक मानला जातो. जेव्हा शुक्र आपली रास किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा व्यक्तीच्या प्रेमसंबंधांवर, आर्थिक स्थितीवर आणि कलात्मक क्षमतेवरही परिणाम होतो.
ज्योतिषीय गणितानुसार, शुक्र आपलं नक्षत्र बदलणार आहे. याचा काही राशींवर शुभ परिणाम होईल, तर काही राशींवर अशुभ. पण आजच्या या बातमीत आपण अशा राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे सावध राहावं लागणार आहे.
अयोध्या येथील ज्योतिषी पंडित कल्की राम यांच्या म्हणण्यानुसार, ज्योतिषीय गणितानुसार 26 जून रोजी शुक्र सूर्याच्या प्रभावी कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात प्रवेश केल्याने काही राशींना सावध राहावं लागणार आहे. तर काही राशींना अनेक प्रकारच्या चांगल्या बातम्या मिळू शकतात. अशा परिस्थितीत, शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे कन्या, तूळ, वृश्चिक आणि कुंभ राशींच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे.
advertisement
कन्या : शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे कन्या राशीच्या लोकांनी आपल्या वैयक्तिक जीवनात संयम आणि सावधगिरी बाळगावी. त्यांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं. तुमची प्रतिष्ठा दुखावली जाऊ शकते. वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
तूळ : तूळ राशीच्या लोकांना अनेक प्रकारची खबरदारी घ्यावी लागेल. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात अपयश येऊ शकतं. प्रेमसंबंधात आणि वैवाहिक जीवनात चढ-उतार येतील. सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
advertisement
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अडचणीचा असेल. तुम्हाला शत्रूंपासून सावध राहावं लागेल. शत्रू तुमच्या चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो. कामाच्या ठिकाणी आपली चालू असलेली जबाबदारी अपूर्ण सोडणं हानिकारक ठरेल. वैवाहिक जीवनातही अनेक प्रकारच्या समस्या येतील.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास कमी होईल. समाजात बोललेल्या गोष्टींचा लोक गैरसमज करून घेऊ शकतात. तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. तुम्हाला विचारपूर्वक बोलावं लागेल. तुमची आर्थिक स्थिती थोडी कमजोर राहू शकते.
advertisement
हे ही वाचा : घरातली तुळस 'हे' संकेत देत असेल, तर समजा लक्ष्मीची कृपा होणार आणि तुम्ही श्रीमंत होणार!
हे ही वाचा : प्रत्येक वेळी अपयश येतंय? तुमच्या कुंडलीत असू शकतो 'कालसर्प योग'; उज्जैनच्या आचार्यांनी सांगितले 'हे' सोपे उपाय
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 25, 2025 10:21 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
सावधान! लवकरच शुक्राचं नक्षत्र बदलणार, 'या' 4 राशींवर येणार संकटं; होऊ शकतं मोठं नुकसान


