Religious: मंदिरात गेल्यावर घंटा का वाजवतात? घंटानाद करण्याला का आहे विशेष महत्त्व
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Temple Religious: धार्मिक मान्यतांनुसार, मंदिरात बसवलेल्या घंटाबद्दल असे मानले जाते की, सृष्टीची सुरुवात झाली तेव्हा जो आवाज झाला तो घंटेचा आवाज होता. याशिवाय घंटा वाजवल्याने ओंकार मंत्राचा उच्चार पूर्ण होतो.
मुंबई : हिंदू रीतिरिवाजांमध्ये मंदिरात पूजेबाबत अनेक प्रथा-परंपरा आहेत. ज्याचे सर्वजण आजही पालन करतात. यापैकी एक गोष्ट म्हणजे मंदिरात गेल्यावर घंटा वाजवणे. प्रत्येक हिंदू मंदिरात एक घंटा नक्की असते. जेव्हाही आपण मंदिरात जातो, तेव्हा नक्कीच घंटा वाजवतो. परंतु, अनेकांना कदाचित माहीत नसेल की, मंदिरातून परतताना घंटा कधीही वाजवायची नसते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी 'न्यूज 18' शी या विषयावर तपशीलवार माहिती दिली आहे.
मंदिरात प्रवेश केल्यावर घंटा का वाजवावी?
सनातन धर्मात प्राचीन काळापासून उपासनेला महत्त्व दिले गेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार, आपण मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवतो तेव्हा घंटा वाजल्यानं आपल्या शरीरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सुख-समृद्धीचे दरवाजेही उघडतात. घंटेचा ध्वनी देवतांना खूप प्रिय असतो, असेही मानले जाते. घंटा वाजवून भक्त मंदिरात प्रवेश करण्यासाठी देवाची परवानगी घेतात आणि देवी-देवतांचे लक्ष स्वतःकडे केंद्रित करतात आणि नंतर त्यांची पूजा करतात. घंटा वाजल्याने शरीरातील सर्व अनिष्ट जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात, त्यामुळे मंदिर आणि आजूबाजूचे वातावरणही शुद्ध होते, असे मानले जाते.
advertisement
मंदिरातून बाहेर येताना घंटा वाजवू नये?
पुराणात सांगितले आहे की, जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपल्या मनात अनेक प्रकारचे विचार चालू असतात, नकारात्मक विचार देखील येत राहतात. ते मंदिरात प्रवेश केल्यानंतर घंटा वाजवताच नष्ट होतात. शंख, घंटा किंवा घंटी यांचा दिव्य आवाज शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि तसे विचार दूर करतात. त्यामुळे जेव्हा आपण मंदिरात देवी-देवतांचे दर्शन घेतो तेव्हा आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा आणि विचार वाहू लागतात. यानंतर आपण प्रेम आणि भक्तीभावाने दर्शन करून परत येतो. पण, बाहेर पडताना पुन्हा घंटा वाजवल्यास मिळालेली सर्व सकारात्मक ऊर्जा भ्रमित होऊन नष्ट होते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी मंदिरातून परतताना घंटा वाजवू नये, असे सांगितले जाते.
advertisement
मंदिरातील घंटानादाचे महत्त्व काय?
धार्मिक मान्यतांनुसार, मंदिरात बसवलेल्या घंटाबद्दल असे मानले जाते की, सृष्टीची सुरुवात झाली तेव्हा जो आवाज झाला तो घंटेचा आवाज होता. याशिवाय घंटा वाजवल्याने ओंकार मंत्राचा उच्चार पूर्ण होतो, असेही सांगितले जाते. धार्मिक मान्यतांनुसार, घंटा वाजवल्याने मूर्तींमध्ये चैतन्य जागृत होते आणि उपासनेचा प्रभाव वाढतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 22, 2024 7:51 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Religious: मंदिरात गेल्यावर घंटा का वाजवतात? घंटानाद करण्याला का आहे विशेष महत्त्व