कोण म्हणतं लग्नानंतर मुलीचं करिअर संपतं? अंजू कुमारीचा आशियात डंका, वय 40, आतापर्यंत मिळवली 150 पदके
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
लग्नानंतर काही वेळा महिलांचे स्वप्न अपूर्ण राहतात. मात्र, अंजू यांच्या पंखांना बळ दिले. त्यांना प्रेरणा दिली. यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबीयांचे स्वप्न साकार केले.
गौरव सिंह, प्रतिनिधी
भोजपुर : अनेक जण म्हणतात की, लग्नानंतर मुलीचे करिअर संपते. मात्र, 40 वर्षांच्या अजू कुमारी याला अपवाद ठरल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी तब्बल 150 पदके जिंकली आहेत. भारत, बिहार आणि रेल्वेसाठी त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. लाखो महिलांसाठी त्यांची कहाणी ही नक्कीच प्रेरणादायी आहे.
लग्नानंतर काही वेळा महिलांचे स्वप्न अपूर्ण राहतात. मात्र, अंजू यांच्या पंखांना बळ दिले. त्यांना प्रेरणा दिली. यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबीयांचे स्वप्न साकार केले. पुण्यात 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान, 44वी राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बिहारच्या भोजपुरची सून अंजू कुमारी यांनी दोन सुवर्ण पदके जिंकली. अंजू कुमारीने लांब उडीमध्ये 4.61 मीटर आणि तिहेरी उडीमध्ये 9.56 मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले.
advertisement
अंजू कुमारीचा प्रेरणादायी प्रवास -
अंजू कुमारी ही आरा येथील खजुरिया गावातील रितेश कुमार यांच्या पत्नी आहेत. त्यांचे सासरे कै.शिव मुरत यादव नेते होते. अंजू यांनी सांगितले की, त्यांचा जन्म चेन्नईत झाला. त्यांचे वडील सिद्धेश्वर प्रसाद सीआयएसएफमध्ये काम करायचे. त्यामुळे त्यांचे शिक्षण चेन्नईतच झाले. दक्षिण भारतात खेळाचे वातावरण खूप चांगले आहे. माझा जन्म झाला तेव्हा पीटी उषा एक आदर्श होत्या. त्यांना पाहून माझ्या वडिलांचे वाटले की, मीसुद्धा खेळाडू व्हावे.
advertisement
यानंतर वडिलांमुळे मी खेळायला सुरुवात केली. मी जिल्ह्यात आणि राज्यात अनेक पदके जिंकली. दरम्यान, 2006 मध्ये मला पूर्व मध्य रेल्वेत उपमुख्य तिकीट निरीक्षक पदावर नोकरी मिळाली. यानंतर 2007 मध्ये लग्न झाले. त्यानंतर कौटुंबिक जीवन आणि नोकरीमुळे त्यांनी खेळणे बंद केले होते. मात्र, नंतर माझ्या सासऱ्यांनी मला प्रेरित केले आणि लग्नाच्या 10 वर्षांनी मी पुन्हा मैदानात उतरली आणि त्यांच्या विश्वास मी सार्थ केला. मैदानावर परतल्यानंतर अवघ्या एक वर्षानंतर मी तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले. तेव्हापासून मी सातत्याने पदके जिंकत आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
आतापर्यंत जिंकले 150 पदके -
अंजू यांचा प्रवास हा फक्त स्टेट आणि नॅशनलपर्यंतच नाही. तर 2019 मध्ये मलेशियाच्या कूचिंग साराबाग शहरात आयोजित एशियन मास्टर्स अॅथलिट स्पर्धेत तीन स्वर्ण पदक जीतकर भारताचे नाव त्यांनी वाढवले. आशियासह विविध ठिकाणी त्यांनी आतापर्यंत तब्बल 150 पेक्षा जास्त पदके जिंकली आहेत. यामध्ये तब्बल 80 ते 90 सुवर्ण पदके आहेत. यासाठी त्यांना त्यांच्या पतीचेही सहकार्य लाभले.
advertisement
2024 आशिया मास्टर अॅथलीटमध्ये पुन्हा निवड -
view commentsअंजू कुमारी 2019 मध्ये आशिया मास्टर अॅथलीटमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भारताला तीन सुवर्णपदके मिळवून दिली. त्यावेळी अंजू यांची निवड ही 35 ते 40 वयोगटात झाली होती. यावेळी पुन्हा नॅशनलमध्ये सुवर्णपदक मिळवल्यानंतर अंजूची पुन्हा आशिया मास्टर ॲथलीट स्पर्धेत निवड झाली आहे. यावेळी त्या 40 ते 45 वयोगटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
Location :
Bhojpur,Bihar
First Published :
February 21, 2024 11:47 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
कोण म्हणतं लग्नानंतर मुलीचं करिअर संपतं? अंजू कुमारीचा आशियात डंका, वय 40, आतापर्यंत मिळवली 150 पदके


