VIDEO : स्टार खेळाडूने बेक्कार कॅच घेतली, गोलंदाजाने अक्षरश:डोकंच पकडलं, अख्खं स्टेडिअम पाहत राहिलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
देशभरात सध्या विविध टी20 लीग सूरू आहेत. या लीगमध्ये अनेक खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतायत. अशाच एका लीगमध्ये एका स्टार खेळाडूने भन्नाट कॅच घेतली आहे.
Abhinav Manohar Super Catch : देशभरात सध्या विविध टी20 लीग सूरू आहेत. या लीगमध्ये अनेक खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतायत. अशाच एका लीगमध्ये एका स्टार खेळाडूने भन्नाट कॅच घेतली आहे.ही कॅच इतकी भयानक होती की गोलंदाज डोकं पकडून मैदानात बसला होता. आणि स्टेडिअमधल्या प्रेक्षकाचा एकाकी श्वास रोखला होता. या कॅचचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून सनरायझर्स हैदराबादचा अभिनव मनोहर आहे. अभिनव मनोहर सध्या महाराजा ट्रॉफी टी20 स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत खेळताना त्याने अप्रतिम कॅच घेतली आहे. या कॅचची क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.
ABHINAV MANOHAR WITH A SUPERB CATCH. 👏pic.twitter.com/PrjnOsKzvs
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 23, 2025
advertisement
महाराजा ट्रॉफी स्पर्धेत हुबळी टायगर्स विरूद्ध म्हैसूर वॉरियर्सचा यांच्यात सामना सूरू होता.या सामन्यात म्हैसूर वॉरियर्सचा फलंदाज मुरलीधर व्यंकटेशला बाद करण्यासाठी हुबळी टायगर्सकडून क्षेत्ररक्षण करणाऱ्या अभिनव मनोहरने ही कॅच घेतली होती. ही घटना 10
व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर घडली.
डावखुरा फिरकी गोलंदाज श्रीशा आचारने टाकलेल्या बॉलला मुरलीधर व्यंकटेशने लाँग ऑनवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता. पण हा बॉल सिक्स जाण्याआधीच मनोहरने अविश्वसनीय कॅच घेतली. या कॅचवर कुणालाच विश्वास बसत नव्हता. गोलंदाज तर मैदानात डोकं पकडून बसला होता. आणि सिक्स जाईल या विचारात असलेले सगळे प्रेक्षक ही कॅच पाहून उठून बसले होते.
advertisement
मनोहरने क्षेत्ररक्षण करताना आणखी एक प्रभाव पाडला, वॉरियर्सच्या डावाच्या शेवटच्या षटकात हर्षिल धर्मानीचा कॅच घेतला.क्षेत्ररक्षणादरम्यानच्या त्याच्या शौर्याव्यतिरिक्त, मनोहरने उशिरा फलंदाजीमध्येही योगदान दिले.130 धावांच्या पाठलागात टायगर्स 71/4 वर पिछाडीवर असताना, 30 वर्षीय खेळाडूने 18 (19) धावा केल्या आणि टायगर्सना अंतिम रेषेच्या जवळ नेले. हुबळी टायगर्सने अखेर फक्त एक विकेट गमावून सामना संपवला, पाच विकेटने विजय मिळवला आणि या प्रक्रियेत नऊ सामन्यांत 12 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले.
advertisement
अभिनव मनोहर सध्या चालू आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारा 15 वा फलंदाज आहे, त्याने आठ सामन्यांत
154 धावा केल्या आहेत. उजव्या हाताच्या या फलंदाजाने सनरायझर्ससाठी गेल्या हंगामात निराशाजनक कामगिरी केली, जिथे त्याने 8 सामने खेळले परंतु 12.20 च्या सरासरीने केवळ 61 धावा केल्या. अभिनव हा एक प्रतिभावान फलंदाज आहे आणि त्याला आयपीएलमध्ये पुरेसा अनुभव आहे, परंतु आयपीएल 2025 मध्ये तो प्रभावी ठरू शकला नाही, त्यामुळे पुढील हंगामात एसआरएच त्याच्या सेवा कायम ठेवण्याची शक्यता कमी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2025 11:16 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : स्टार खेळाडूने बेक्कार कॅच घेतली, गोलंदाजाने अक्षरश:डोकंच पकडलं, अख्खं स्टेडिअम पाहत राहिलं