advertisement

Shreyas Iyer : रहाणेच्या एका फीडबॅकने गेम फिरला! श्रेयस अय्यरला 72 तासात दुसरा धक्का

Last Updated:

आशिया कपसाठी श्रेयस अय्यरची टीम इंडियामध्ये निवड न झाल्यामुळे अनेकांनी निवड समितीच्या या निर्णयावर टीका केली आहे. टीम इंडियाची निवड झाल्याच्या 72 तासांमध्येच श्रेयस अय्यरला दुसरा धक्का लागला आहे.

रहाणेच्या एका फीडबॅकने गेम फिरला! श्रेयस अय्यरला 72 तासात दुसरा धक्का
रहाणेच्या एका फीडबॅकने गेम फिरला! श्रेयस अय्यरला 72 तासात दुसरा धक्का
मुंबई : आशिया कपसाठी श्रेयस अय्यरची टीम इंडियामध्ये निवड न झाल्यामुळे अनेकांनी निवड समितीच्या या निर्णयावर टीका केली आहे. टीम इंडियाची निवड झाल्याच्या 72 तासांमध्येच श्रेयस अय्यरला दुसरा धक्का लागला आहे. अजिंक्य रहाणेने मुंबईची कॅप्टन्सी सोडल्यानंतर श्रेयस अय्यरला मुंबईच्या रणजी टीमचं नेतृत्व दिलं जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती, पण आता शार्दुल ठाकूर मुंबईच्या रणजी टीमचा कर्णधार होणार असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. अजिंक्य रहाणने सोशल मीडियावर एक पोस्ट करून नव्या नेतृत्वाला तयार करण्यासाठी मुंबईची कॅप्टन्सी सोडत असल्याचं रहाणने सांगितलं.
'मुंबईचं नेतृत्व करण्याचा आणि चॅम्पियनशीप जिंकण्याचा अभिमान आहे. नवा हंगाम सुरू होत आहे, त्यामुळे नव्या नेतृत्वाला तयार करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं मला वाटतं, त्यामुळे मी मुंबईची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला आहेत, पण मी खेळाडू म्हणून मुंबई क्रिकेटला आणखी ट्रॉफी जिंकवण्यासाठी सर्वकाही देईन. येणाऱ्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहे', अशी पोस्ट रहाणेने केली आहे.
advertisement

रहाणेच्या फिडबॅकने फिरला गेम!

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने 2023-24 साली 7 वर्षांनंतर रणजी ट्रॉफी पटकावली. तसंच 2024/25 ला इराणी ट्रॉफीमध्येही विजय मिळवला होता. दुलीप ट्रॉफीसाठी शार्दुल ठाकूरची वेस्ट झोनचा कर्णधार म्हणून निवड झाल्यानंतर आता त्याला मुंबईच्या टीमचंही नेतृत्व मिळालं आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार मुंबई क्रिकेटच्या निवड समिती सदस्यांनी अजिंक्य रहाणेसोबत पुढच्या कॅप्टनबाबत चर्चा केली आणि त्याचा फीडबॅकही घेतला. अजिंक्य रहाणेने मागच्या रणजी ट्रॉफीच्या हंगामात 14 इनिंगमध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 467 रन केल्या. शार्दुल ठाकूरने मागच्या काही वर्षात मुंबई क्रिकेटच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. मागच्या मोसमात शार्दुलने एका शतकाच्या मदतीने 505 रन केल्या तसंच 9 सामन्यांमध्ये 35 विकेटही घेतल्या.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer : रहाणेच्या एका फीडबॅकने गेम फिरला! श्रेयस अय्यरला 72 तासात दुसरा धक्का
Next Article
advertisement
BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement