Video : 'सारे DRS तू ही ले ले...', मॅच झाल्यावर ऋषभ आणि हर्षितने धरला कुलदीपचा गळा, म्हणतो 'माझ्यासाठी एक...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
All DRS is yours Rishabh pant To Kuldeep Yadav : फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, ऋषभ पंत आणि हर्षित राणा यांच्यात गप्पांची मैफील रंगली अन् तिघंही मस्ती करताना दिसत आहेत.
Kuldeep Yadav On DRS review : टीम इंडियाचा चायनामॅन बॉलर कुलदीप यादव याचा डीआरएस घेण्यासाठी झालेला केविलवाणा चेहरा पाहिल्यावर रोहित शर्माला देखील हसू आवरलं नव्हतं. पहिल्या दोन विकेट घेतल्यावर कुलदीपने डीआरएस घेण्यासाठी तगादाच लावला होता. मात्र, केएल राहुल अन् रोहित शर्माने त्याला फटकारलं. मात्र, तरीही कुलदीपच्या अपिल कमी झाल्या नाहीत. याच गोष्टीवरून मॅच संपल्यानंतर ऋषभ अन् हर्षितने कुलदीपची शाळा घेतली.
ऋषभने कुलदीपचे पाय खेचले
बीसीसीआयने सामन्यानंतर खेळाडूंच्या गप्पांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, ऋषभ पंत आणि हर्षित राणा यांच्यात गप्पांची मैफील रंगली अन् तिघंही मस्ती करताना दिसत आहेत. त्यावेळी ऋषभ अन् हर्षितने कुलदीपचे पाय खेचले.
advertisement
सर्व डीआरएस तुमच्यासाठी आहेत
माझे डीआरएस नेहमी चुकतात. मला वाटतं की ही विकेट आहे. शांत राहण्यास सांगण्यासाठी तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हवे असतात. मला वाटतं की संघाला मिळणारा प्रत्येक डीआरएस माझ्यासाठी आहे आणि मला तो स्वीकारावाच लागेल, असं कुलदीप म्हणाला. कुलदीपचं वक्तव्य ऐकून ऋषभने त्याची शाळा घेतली. हा भाऊ, सर्व डीआरएस तुमच्यासाठी आहेत, असं म्हणत कुलदीपला डिवचलं. त्यावर हर्षित राणाने देखील उडी घेतली.
advertisement
advertisement
तीन वेळा डीआरएस घेण्यापासून रोखले
दरम्यान, रोहित शर्माने कुलदीप यादवला तीन वेळा डीआरएस घेण्यापासून रोखले. गोलंदाजीच्या फॉलो-थ्रू दरम्यान त्याने त्याला परत जाण्यास सांगितले. विराट कोहलीच्या मदतीने, रोहितने कुलदीपचा पाय ओढण्याची संधी सोडली नाही. रोहितने इशारा केला, तू परत जा... यावर कोहली देखील हसताना दिसला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 11:49 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Video : 'सारे DRS तू ही ले ले...', मॅच झाल्यावर ऋषभ आणि हर्षितने धरला कुलदीपचा गळा, म्हणतो 'माझ्यासाठी एक...'


