Rishabh Pant : STUPID, STUPID वाक्य काय पाठ सोडेना! शतक ठोकुनही पंतला कोणी म्हटलं स्टुपिड? पाहा VIDEO

Last Updated:

आयपीएलच्या संपूर्ण हंगामात फ्लॉप ठरलेल्या रिषभ पंतने बंगळुरूविरूद्धच्या शेवटच्या सामन्यात शतक ठोकलं होतं. या शतकाच्या बळावर लखनऊ सुपर जाएट्सने 227 धावा केल्या होत्या.

rishabh pant news
rishabh pant news
RCB vs LSG, Rishabh Pant Century : आयपीएलच्या संपूर्ण हंगामात फ्लॉप ठरलेल्या रिषभ पंतने बंगळुरूविरूद्धच्या शेवटच्या सामन्यात शतक ठोकलं होतं. या शतकाच्या बळावर लखनऊ सुपर जाएट्सने 227 धावा केल्या होत्या. पण आरसीबीने हे लक्ष्य 6 विकेटस राखून पुर्ण करत हा सामना जिंकला. त्यामुळे रिषभ पंतचे शतक वाया गेले.त्यामुळे रिषभ पंतला आता स्टुपिट म्हटलं गेलं आहे.
खरं तर रिषभ पंतला स्टूपिड म्हटल्याची घटना याआधीही घडली होती. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत ही घटना घडली होती.सुनील गालस्कर त्या सामन्यात काँमेंट्री करत होते.यावेळी चुकीचा शॉर्ट खेळून रिषभ पंत आऊट झाल्यानंतर गावस्करांनी त्याला STUPID, STUPID, STUPID म्हटलं होतं. त्यानंतर आता आयपीएलमध्ये रिषभ पंतला स्टुपिड म्हटलं गेलं आहे.
advertisement
बंगळुरू विरूद्धच्या शेवटच्या साखळी फेरीतील सामन्यात रिषभ पंतची बॅट तळपली होती. त्याने या सामन्यात 54 बॉलमध्ये शानदार शतक झळकावलं होतं. या खेळीत त्याने 6 गगनचुंबी षटकार आणि 10 खणखणीत चौकार मारले होते. या शतकाचं त्याने भन्नाट सेलीब्रेशन देखील केले होते. रिषभ पंतने शतकानंतर हेल्मेट आणि हातातले ग्लोव्हज काढून मैदानात कोलांटी उडी मारली होती. या दरम्यान विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माच्या शेजारी बसलेल्या एका महिलेने पंतला STUPID म्हटल्याचे कॅमेरात कैद झाले होते. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
advertisement
2025च्या मेगा लिलावात लखनौ सुपर जायंट्सने त्याला 27 कोटी रुपयांना खरेदी केले होते. परंतु स्पर्धेच्या सुरुवातीला तो छाप पाडू शकला नव्हता. परंतु अंतिम सामन्यात, त्याच्या खांद्यावर कर्णधारपद असताना, पंतने त्याचे खरे कौशल्य दाखवले आणि चाहत्यांना फलंदाजीच्या उत्कृष्ट प्रदर्शनाने आनंद दिला.

क्वालिफायर 1 सामना कुठे रंगणार?

प्लेऑफच्या सामन्यांना गुरूवारी 28 मे पासून सूरूवात होत आहे. त्यामुळे क्वालिफायर 1 चा सामना हा पॉईटस टेबलमध्ये पहिल्या स्थानी असलेल्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे.हा सामना मुल्लानपूर स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rishabh Pant : STUPID, STUPID वाक्य काय पाठ सोडेना! शतक ठोकुनही पंतला कोणी म्हटलं स्टुपिड? पाहा VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement